बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

7 वर्षाच्या मुलीने केलं असं काही की, ते पाहून आयएएस अधिकाऱ्याने ठोकला सलाम, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | सोशल मीडियावर अनेक लहान मुला-मुलींचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ आपल्याला प्रेरणा देणारे असतात. आपल्याला माहित आहे की जर आपण एखादी गोष्ट करायची ठरवली तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही.

अनेकांना उंच-उंच डोंगर चढायला आवडतात. तसेच अनेकांना पिलरवर चढायलाही आवडते. परंतू पिलरवर चढणे जितके सोपे दिसते, तेवढे ते प्रत्यक्षात करताना नसते. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. त्यासाठी आपलं शरीर लवचिक असलं पाहिजे. तसेच आपल्याला आपल्या शरिराचा तोलही सांभाळता आला पाहिजे. अशातच एका लहान मुलीचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक 7 वर्षाची मुलगी पिलरवर चढायचा प्रयत्न करत आहे. ती ज्या पिलरवर चढायचा प्रयत्न करत आहे. त्या पिलरवर चढण्यासाठी काहीही नसल्याचं दिसून येत आहे. तरीही ती मुलगी पिलरवर चढायचा प्रयत्न करत आहे. सुरूवातीला ती त्या पिलरवर चढण्याचा प्रयत्न करते. परंतू, चढण्यासाठी कोणताही आधार नसल्यानं, ती त्यावरून घसरते. ती पुन्हा दुसऱ्यांना प्रयत्न करते. परंतू तेव्हाही काही पाऊल वर चढते आणि परत खाली पडते. असं ती खूपवेळा करते चढते खाली पडते. एवढं होऊनही ती आपली हार मानत नाही. ती त्यावर चढायचे प्रयत्न सुरूच ठेवते. काहीवेळ असंच सुरू राहिल्यानंतर अखेर ती त्या पिलरच्या टोकापर्यंत पोहचतेच.

तिचा हा व्हिडीओ आयएएस अधिकारी डॉ. एम. व्हि. राव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरून शेअर केला आहे. त्यांनी व्हिडीओ शेअर करताना ‘ही लहान मुलगी माझी गुरू आहे’ असं कॅप्शनही दिलं आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

प्रेयसीला सासरी जाताना बघू शकला नाही; प्रियकराने रस्त्यात अडवून जे केलं त्याने सगळे हादरले

आनंदाची बातमी! देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट; सक्रिय रूग्णसंख्याही घटली

वाढदिवसाला आई-वडिलांनी दिलेलं गिफ्ट पाहून मुलीलाही बसला धक्का, पाहा व्हिडीओ

कुऱ्हाडीने वार करत एकुलत्या एक मुलाने घेतला बापाचा जीव, धक्कादायक कारण आलं समोर

काँग्रेसच्या हातातून आणखी एक राज्य निसटणार?; 25 आमदार दिल्लीत दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More