बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पिंपरी चिंचवडमध्ये भीषण अपघात, भरधाव कारने चिमुकल्याला चिरडलं

पुणे | अलिकडच्या काही दिवसांमध्ये रस्त्यांवरील अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालीये. अपघाताची ही समस्या गंभीर बनत चालली आहे. अशात पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक भीषण अपघात झाला आहे. एका कारने 9 वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं आहे. या अपघातामुळे चिमुकला गंभीर जखमी झाला आहे.

पिंपरी चिंचवडमधील सौदागर भागात ही घटना घडली आहे. पिंपळे सौदागरच्या साई वास्तू हाउसिंग को-ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये गुरुवारी दुपारच्या सुमारास 9 वर्षांचा ईशान त्याच्या मित्रांसोबत खेळत होता. यावेळी त्याच सोसायटीमध्ये रहिवासी असणाऱ्या सोनल देशपांडे रॅश ड्रायव्हिंग करत होत्या. यादरम्यान, ईशानची कारला धडक झाली. ही थरारक घटना सोसायटीमधील सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे.

धडक झाल्यानंतर कार ईशानच्या छाती, तोंड, पोट, डोक आणि खांद्यावरुन गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर ईशानला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच ईशान सध्या मृत्यूशी झूंज देत आहे.

दरम्यान, लाॅकडाऊन काळात ईशानच्या वडिलांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संकटांना तोंड द्यावं लागत होतं. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती ढासळली आहे. अशातच पोटच्या लेकराचा भीषण अपघात झाल्यामुळे त्याच्या खर्चाबाबत त्यांना चिंता लागली आहे. तसेच सोनाली देशपांडे यांच्याविरुद्ध ईशानच्या कुटुंबियांनी तक्रार नोंदवली आहे.

थोडक्यात बातम्या-

एअर इंडियाला रूळावर आणण्यासाठी बरीच मेहनत करावी लागेल- रतन टाटा

सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शेहनाज पहिल्यांदाच आली समोर, पाहा व्हिडीओ

‘जे कोरोना लस घेतील त्यांना फ्रीमध्ये…’; पॉर्नस्टारने दिलेल्या ऑफरने खळबळ

काँग्रेसची दुखणी साध्या उपायांनी बरी होणार नाहीत- प्रशांत किशोर

अखेरचा चेंडू अन् 6 धावा; श्वास रोखून धरणाऱ्या सामन्यात विराटच्या शिलेदाराचा चमत्कार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More