विदेश

‘कोरोना’ बाधित 30 हजार लोकांना मारण्याची परवानगी द्या; ‘चीन’ची न्यायालयाकडे मागणी!!

नवी दिल्ली |  कोरोना व्हायरसने चीनसह जगभरात धुमाकूळ घातला आहे. मात्र, चीनमधील परिस्थिती भयंकर बनली आहे. चीनमध्ये आतापर्यंत या कोरोना व्यायरसने 630 पेक्षा अधिक लोकांचा जीव घेतला आहे. तर 30 हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर चीनमधून धक्कादायक बातमी मिळत आहे.

कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या 30 हजार जणांना मारण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी चीन सरकारने सर्वोच्च न्यायालयात केल्याचं कळत आहे. या वृत्ताला पुष्टी मिळाली नसली तरी सोशल मीडियावर हे वृत्त फिरत आहे.

कोरोना व्हायरसने भयंकर रुप धारण केलं आहे. हा व्हायरस असाच वाढत राहिला तर अधिक लोकांचा बळी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोरोना व्यायरसने बाधित झालेल्यांना मारण्याची परवानगी द्या, जेणे करुन या व्हायरसचा संसर्ग रोखता येईल, अशी मागणी चीन सरकारने न्यायालयात केल्याचं सांगण्यात येतंय.

दरम्यान, भारतातही या व्हायरसचा प्रसार झाला आहे. केरळमध्ये याचा पहिला रुग्ण आढळला असून भारतासारख्या देशात हा व्हायरस गतीने पसरण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग बातम्या- 

एक केजरीवाल सगळ्यांना लय भारी पडतोय; ‘सामना’तून शिवसेनेची स्तुतीसुमनं

आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही ‘दिशा’ कायदा आणणार; अनिल देशमुखांची घोषणा

महत्वाच्या बातम्या- 

दिल्ली निवडणुकीनंतर भाजपचं महाराष्ट्रात ‘मिशन कमळ’?

पंतप्रधान मोदींनी केजरीवाल सरकारकडून आदर्श घ्यावा; शिवसेनेचा सल्ला

देवेंद्र फडणवीसांसाठी खुशखबर! केंद्रात अर्थमंत्रिपदाची जबाबदारी?

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या