Top News

भारताविरोधात चीनची नवी खेळी; भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी

बिजिंग | भारत आणि चीनमध्ये गलवान खोऱ्यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमं तेथील प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. यामुळे चिनी सरकारने नवी खेळी करत भारतीय प्रसारमाध्यमं आणि वेबसाईट्स ब्लॉक केल्या आहेत. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

चिनी नागरिक फक्त व्हीपीएनच्या सहाय्याने भारतीय मीडिया वेबसाईट्स पाहू शकतात. पण चीनकडे तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत फायरवॉल उपलब्ध असून या माध्यमातून व्हीपीएनदेखील ब्लॉक केलं जाऊ शकतं.

चीनने भारतीय वृत्तपत्र आणि वेबसाईट्स ब्लॉक करण्याचा निर्णय भारताने 59 अ‍ॅपवर बंदी घालण्याच्या आधीच घेतला असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, 15 जून रोजी पूर्व लडाखमध्ये भारत आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाल्यापासून दोन्ही देशांमध्ये तणाव आहे. या चकमकीत दोन्ही देशांचं नुकसान झालं असून भारताचे 20 जवान शहीद झाले आहेत तर चिनी सैनिकही ठार झाले आहेत.

ट्रेंडिंग बातम्या-

धक्कादायक! लग्नाच्या दुसऱ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू, लग्नात हजर 100 पेक्षा अधिक जणांना कोरोना

‘विठ्ठला मानवाने या संकटापुढे हात टेकले….आतातरी चमत्कार दाखव’; मुख्यमंत्र्यांची विठुरायाला साद

महत्वाच्या बातम्या-

तिथे मॅप बदलले जातायेत आणि आपण इथे ॲप वर बंदी घालतोय, आव्हाडांचा मोदींवर निशाणा

वडिलांना घेऊन 1200 किमीचा प्रवास करणाऱ्या ज्योतीवर आता चित्रपट येणार

कोरोना लसीच्या शोधात अमेरिका आघाडीवर; केलंय हे अचाट काम

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या