Top News देश

आम्ही दिलेले टेस्ट किट उत्तमच पण भारतीयांना वापरायच्या कळत नाही; चीनचं भारताकडे बोट

Loading...

नवी दिल्ली |  आम्ही दिलेले रॅपीड टेस्ट किट अतिशय चांगले आणि उत्तम दर्जाचे आहेत पण भारतियांना त्याचा वापर करता येत नाही, असं चीनने म्हटलं आहे. भारतीने चीनने पाठवलेल्या टेस्ट कीटवर आक्षेप नोंदवला होता. त्यावर चीनने हे स्पष्टीकरण दिलेलं आहे.

राजस्थान आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारने चीनमधून आलेल्या टेस्ट कीट ह्या सदोष असल्याच्या तक्रारी आयसीएमआरकडे केल्या होत्या. त्यावर आयसीएमआरने संबंधित टेस्ट कीटचा वापर तात्काळ थांबवण्याचे आदेश दिले होते.

चीनमधल्या वाँडफो बायोटेक आणि लिव्हझॉन डायग्रोस्टिक या दोन कंपन्यांनी भारताला हे किट पाठवले होते. भारताने आक्षेप नोंदवल्यानंतर आपल्या किटमध्ये कोणताही दोष नसून जगभरात ते पाठवले जात असल्याचं चीनने सांगितलं आहे.

दुसरीकडे चीनने किटची निर्मिती करण्याआधी त्यांची योग्य चाचणी केली असं वाटत नाही. चीनने फार कमी रुग्णांवर हे टेस्ट वापरुनपाहिलं असावं. जगभरातील मागणी लक्षात घेता त्यांना आपलं किट बाजारात पाठवण्याची घाई होती असं दिसतंय, असं भारतीय तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

विद्यापीठाच्या ऑनलाईन परीक्षा कधी होणार?, उदय सामंत म्हणाले…

कोरोनामुळे जगभरातील उद्योग बुडाले मात्र ‘या’ तीन उद्योजकांची चांदी

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या