Top News देश

कोरोनाबाबत चीनचा अत्यंत धक्कादायक खुलासा

नवी दिल्ली |  ज्या चीनमध्ये कोरोना व्हायरसचा उदय झाला आणि त्याचा संसर्ग सगळ्या जगामध्ये पसरला त्याच चीनने आता कोरोनाबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा केला आहे. 1541 रूग्णांना कोरोनाची लक्षणं दिसून आली नाहीत, असा मोठा खुलासा चीनने केला आहे.

चीनच्या आरोग्य विभागाने एक घोषणा केली आहे. ज्या रुग्णांमध्ये कोरोनाचे लक्षण दिसून आले नाहीत त्यांची माहिती आता जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे हा आकडा नेमका किती असेल याकडे अवघ्या चीनचं लक्ष लागलं आहे.

चीनने सोमवारपर्यंत 1541 अशा रुग्णांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले होते. त्यात परदेशतून आलेल्या 205 जणांचा समावेश होता. चीन अश्या रुग्णांची संख्या आणि त्यांच्या प्रकृती बद्दल माहीती बुधवारपासून जाहीर करेल, असं चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाचे प्रमुख चांग जाईल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कोविड -19 मध्ये संक्रमित लक्षणं मुक्त रूग्णांमुळे संक्रमण अधिक पसरु शकते, अशी भिती व्यक्त करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

क्वारंनटाईन सांगितलं तर तिथेही गप्प नाही… नमाज पठण सुरूच

घराबाहेर पडणारे दवाखान्यात अन् नियम मोडणारे यापुढे तुरूंगात दिसतील- अजित पवार

महत्वाच्या बातम्या-

राज्यात एकाच दिवशी तब्बल 81 रूग्ण वाढले; पाहा कोणत्या शहरात किती रूग्ण वाढले…

कोरोनाच्या संकटात अजय देवगननं सिनेकामगारांना दिली मोठी रक्कम

क्वारंटाईन टाईम म्हणत ‘या’ अभिनेता-अभिनेत्रीनं बेडरुमधले फोटो सोशल मीडियावर टाकले

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या