बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ड्रॅगनचे पाप, जगाला ताप; चिनी रॉकेट्स कोसळून जगाचा नरक करणार’

मुंबई | अंतराळात पाठवले गेलेलं चीनचं रॉकेट अंतराळात प्रवेश केल्यानंतर अनियंत्रित झाल्यामुळे ते आता पुन्हा पृथ्वीवर येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 21 टनाचं हे राॅकेट जगाच्या कोणत्याही भागात पडण्याची शक्यता आहे. त्यावर आता सामनाच्या अग्रलेखातून चीनवर टीका करण्यात आली आहे. ड्रॅगनचे पाप, जगाला ताप, अशा शब्दात सामना अग्रलेखातून चीनवर टीका करण्यात आली आहे.

जगावरील आणखी एका चिनी संकटाची टांगती तलवार बनलेले ‘लाँग मार्च 5 बी वाय 2′ रॉकेट हे चीनच्या एकमेव जागतिक महासत्ता बनण्याच्या महत्त्वाकांक्षेचे पाप आहे. ज्या चिनी अंतरिक्ष स्थानकासाठी हे रॉकेट सोडण्यात आले, त्या अंतरिक्ष स्थानकाला चीनने ‘टियोंगॉन्ग’, म्हणजे ‘स्वर्गातील महाल’ असं नाव दिलं आहे. उपमा अलंकार म्हणून हे ठीक असले, तरी त्यासाठी सोडली जाणारी चिनी रॉकेट्स कोसळून ‘जगाचा नरक’ करणार असतील तर कसे व्हायचं, असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

चीनच्या अवकाश धोरणाचा भाग असलेले ‘लाँग मार्च 5 बी’ हे चीनने अवकाशात सोडलेलं रॉकेट आता जगासाठी मोठं संकट ठरलं आहे. या रॉकेटवरील नियंत्रण सुटलं असल्यानं ते जगाच्या कुठल्याही भागावर कोसळू शकते. तब्बल 21 टन वजनाचे हे रॉकेट आहे. साहजिकच हे ज्या भागात कोसळेल, तेथे किती मोठी ‘तबाही’ होईल, याची कल्पनाच करवत नाही, असंही अग्रलेखातून म्हटलं आहे.

‘चीन आणि राक्षसी महत्त्वाकांक्षा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. चीनच्या भौगोलिक घुसखोरीचे चटके आणि तडाखे हिंदुस्थान पूर्वीपासूनच अनुभवत आहे. हिंदुस्थानच्या भोवतालची नेपाळ, पाकिस्तान, म्यानमार, बांगलादेश, श्रीलंका ही राष्ट्रेही चिनी ड्रॅगनने आपल्या पंखाखाली घेतली आहेत. संपूर्ण दक्षिण आशिया, जपानपासून थेट ऑस्ट्रेलियापर्यंतच्या भागावर नियंत्रण ठेवण्याची ड्रॅगनची महत्त्वाकांक्षा आहे’, असा आरोप सामनातून करण्यात आला आहे.

थोडक्यात बातम्या-

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

गोकुळची निवडणुक जिंकताच सतेज पाटलांनी शेतकऱ्यांसाठी केली ‘ही’ मोठी घोषणा

चीनमुळे पुन्हा जगाच्या डोक्याला ताप, ‘या’ देशांवर पडू शकतं हरवलेलं रॅाकेट!

लातुरात अनोखा विवाहसोहळा, ‘या’ कारणामुळं एकच चर्चा सुरु!

“कोरोनाने आपल्या पालकांना गमावलेल्या मुलांना मोफत शिक्षण द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More