देश

मोदी सरकारचा आणखी एक दणका, चीनी कंपन्यांचं कंबरडं मोडणार!

नवी दिल्ली | बीएसएनएलच्या 4G अपग्रेडेशनसाठी काढलेल्या निविदा दूरसंचार मंत्रालायनं बुधवारी रद्द केल्या आहेत. या प्रक्रियेत चिनी कंपन्यांना दूर ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा आहे. या अपग्रेडेशनसाठी आता पुन्हा नव्याने निविदा मागवण्यात येणार आहे. हिंदुस्तान टाइम्सने याबाबत वृत्त दिले आहे.

पुढच्या 2 महिन्यांत बीएसएनएलकडून 4G अपग्रेडेशनच्या निविदा काढण्यात येतील. त्यासाठी सहा जणांची समिती देखील नेमण्यात येणार आहे. या समितीची नियुक्ती झाल्यानंतर या निविदा काढल्या जातील.

बीएसएनएलच्या अपग्रेडेशनसाठी कुठल्या सामुग्रीची गरज असणार आहे, याचा अहवालही सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या नव्या निविदांमध्ये चिनी कंपन्यांना स्थान असणार नाही.

4G अपग्रेडेशनसाठी चिनी साधनं वापरु नका, अशी सूचना केंद्र सरकारने बीएसएनएलला दिली आहे. दुसरीकडे मोदी सरकारने 59 चिनी मोबाईल अ‌ॅप्सवर बंदी घातली घालून चीनला दणका दिला आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”

हिंदुस्थानी भाऊला आयएसआय या दहशतवादी संघटनेकडून जीवे मारण्याची धमकी!

महत्वाच्या बातम्या-

पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी मराठीतून दिल्या आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

वंचित बहुजन आघाडीकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सुशांतवर गैरवर्तनाचे आरोप केले नाहीत, या अभिनेत्रीचा पोलिसांसमोर खुलासा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या