बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात कोरोनामुळे जळणाऱ्या सरणावरून खिल्ली उडवणं ‘या’ पक्षाला पडलं महागात

नवी दिल्ली | भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे आणि वाढत्या रुग्णसंख्येसह मृतांची संख्याही अधिक आहे. यावरूनच चीनने आपल्या मायक्रोब्लॉगिंग साईट विबोवर भारताबद्दल वादग्रस्त विधानांसह फोटो पोस्ट केलेे आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची कम्युनिस्ट पार्टी सेंट्रल पाॅलिटिकल अँड लीगल अफेअर या पक्षाच्या अधिकृत अकाऊंटवरून भारतात स्मशानभूमीत जळणाऱ्या सरणावरून खिल्ली उडवली आहे. मात्र हा सर्व प्रकार त्यांच्याच अंगलट आल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. भारताबद्दल असंवेदनशिल वक्तव्य केल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चीनवर मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठली आहे आणि हे अमानवी कृत्य असल्याचं बोललं जात आहे.

फोटोमध्ये चीनला रॉकेट लॉन्च करताना दाखवलं असून भारतातील स्मशानभूमीमध्ये चिता पेटत असताना दाखवण्यात आल्या आहेत. या पक्षाने टाकलेल्या पोस्टवर नागरिकांकडून तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला गेला. विशेष म्हणजे सोशल मीडियावर कम्युनिस्ट पक्षाच्याच लोकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. एकीकडे चीन भारताला वैद्यकीय मदत करण्यासाठी पुढे येत आहे, तर दुसरीकडे अशा प्रकारे टीका करून भारताची खिल्ली उडवत असताना पाहायला मिळत आहे.

चीनचे अधिकृत सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सचे संपादक हु शिजिन यांनी भारतासाठी आपण मानवतेचा झेंडा हातात घेतला पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. त्याचबरोबर, चीनने भारताला ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरसारख्या वस्तू दिल्या तरी भारत त्याचा वापर गरिबांना सोडून श्रीमंतांना वाचवण्यासाठी करेल, असं म्हणत त्यांनी भारतावर एक प्रकारे गंभीर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मी रस्त्यावर उतरून लढणारी बाई आहे; भाजपला तर 50 जागाही मिळाल्या नसत्या, जर…

पुढच्या 2 दिवसात राज्यभरात गारपिटीची शक्यता; हवामान विभागाकडून शेतकऱ्यांना ‘हे’ आवाहन

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

“हा विजय म्हणजे मस्तवाल राजकारणास मिळालेली चपराक आहे, भाजप हारला कोरोना जिंकला”

मुंबईतील कोरोनाबाधितांची आकडेवारी दिलासादायक; बरे होणाऱ्यांची संख्या अधिक

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More