विदेश

चीनमध्ये नव्या व्हायरसचा धुमाकूळ; तब्बल इतक्या लोकांना झालीय ‘या’ व्हायरसची लागण

बिजींग | जगभरातील कोरोना व्हायरसची दहशत अद्याप कायम आहे. कोरोना बाधीतांची आकडेवारीही छातीत धडकी भरवणारी आहे. चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या या व्हायरसनं संपूर्ण जगाला वेठीस धरलेलं आहे. अशा भीतीच्या वातावरणातच चीनमध्ये ‘एसएफटीएस'( SFTC) या नव्या व्हायरसनं आता धुमाकूळ घातला आहे.

प्राप्त माहितीनुसार, चीनच्या जियांग्सू प्रांतात या व्हायरसचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे. या एसएफटीएस व्हायरसची चीन मधील तब्बल 60 पेक्षा अधिक नागरिकांना लागण झाल्याची माहिती आहे.

जियांग्सूची राजधानी असलेल्या नानजियांगमधील एका महिलेमध्ये सुरूवातीला खोकला आणि तापासारखी लक्षणं दिसून आली आहेत. या महिलेच्या शरिरातील ल्युकोसाइट आणि प्लेटलेटचं प्रमाण कमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. यामुळे या व्हायरसचा चीनमध्ये प्रादुर्भाव झाल्यास प्रशासनाच्या चिंतेत वाढ होऊ शकते.

दरम्यान, एसएफटीएस हा व्हायरस नवा नसून चीनमध्ये 2011 सालीच या व्हायरसची माहिती झाली होती. प्राण्यांच्या शरीरावर चिकटणाऱ्या कीटकांमुळे हा आजार माणसांमध्ये पसरत असल्याची माहिती संशोधकांनी या व्हायरसबाबत बोलताना दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आदिवासी मुले, महिलांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची घोषणा

न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरच्या बिलबोर्डवर झळकले भगवान श्रीराम आणि राम मंदिराचे फोटो!

देशात कोरोनाचा प्रकोप, गेल्या 24 तासांतली धक्कादायक आकडेवारी

कोविड रूग्णालयात भीषण अग्नितांडव!; 8 कोरोना बाधीत रूग्णांचा होरपळून मृत्यू

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या