ट्रेन आता पटरी सोडणार, जगातील पहिली रस्त्यावर चालणारी ट्रेन सुरु!

नवी दिल्ली | ट्रेनने आता पटरी सोडली असून जगातील पहिली रस्त्यावर चालणारी ट्रेन सुरु झालीय. चीनच्या झूजो प्रांतात ही ट्रेन सुरु करण्यात आलीय. 

पटरी आणि ट्रेन यांचं एक अतूट नातं आहे. मेट्रो किंवा बुलेट ट्रेन आली तरी पटरी काही सुटली नाही. मात्र आता या ट्रेनमुळे यापुढच्या काळात ट्रेन चक्क रस्त्यावर चालताना दिसणार आहेत. 

चीनच्या या स्मार्ट ट्रेनमध्ये सध्या 300 प्रवासी प्रवास करु शकतात. तसेच ते मेट्रोप्रमाणे एकमेकांच्या डब्यातही जाऊ शकतात. ही ट्रेन ताशी 70 किलोमीटर वेगाने धावू शकते. त्यासाठी रस्त्यामध्येच सेंसर बसवण्यात आले आहेत.