बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीनची तालिबानला मोठी आर्थिक मदत; मदतीच्या रकमेचा आकडा वाचून थक्क व्हाल

बिजींग | अफगाणिस्तानमध्ये तलिबानची सत्ता सुरू झाली आहे. तालिबानने महासत्ता असणाऱ्या अमेरिकेशी पंगा घेऊन शेवटी अफगाणिस्तानची सत्ता मिळवली आहे. अफगाणिस्तान सरकार आणि अमेरिका यांच्यासोबत लढताना तालिबान दहशवाद्यांना मदत करणारे हात आता जगाला दिसू लागले आहेत.

तालिबान दहशतवाद्यांनी अफगणिस्तानमध्ये सरकार स्थापन करून मंत्री सुद्धा नेमले आहेत. आपल्या नियम आणि अटीनुसार आता तालिबान अफगाणिस्तानवर आपली हुकूमत गाजवणार आहे. या तालिबानला अफगाणिस्तानवर राज्य करत असताना देशात कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी त्यांना पैसा हा चीन पुरवत आहे. चीन सरकारने तालिबानला 310 लाख अमेरिकन डाॅलर देण्याची घोषणा केली आहे.

तालिबान जगासमोर स्वत:ला चांगलं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. अफगाणिस्तानमधील अराजकता समाप्त करण्यासाठी आणि योग्य शासन व्यवस्था देण्यासाठी तालिबानला मदतीची गरज असून, यासाठी अफगाणिस्तानमधील नवीन तालिबान सरकारला 310 लाख अमेरिकन डॉलर आर्थिक मदतीची घोषणा चीन सरकारकडून करण्यात आली आहे, असं चीनकडून जाहीर करण्यात आलं आहे.

चीन आणि पाकिस्तान या दोन देशांनीच तालिबानचे लाड पुरण्यास सुरूवात केली आहे. आता जगातील इतर देश काय करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. चीन तालिबानला लसींचा पुरवठा सुद्धा करणार आहे. पहिल्या टप्प्यात 30 लाख लसी अफगाणला पाठवण्यात येतील, अशी माहिती चीन सरकराने दिली आहे.

थोडक्यात बातम्या 

सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धकानं मान मोडली, पैलवानाचा रिंगणातच मृत्यू

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात कलम 144 लागू, प्रशासनाचे जमावबंदीचे आदेश

ईडी कोर्टाने नोंदवलेल्या ‘या’ निरीक्षणामुळे एकनाथ खडसेंचं टेंशन वाढलं!

“ब्राह्मणांचा कायमच वापर झाला, शिवाजी महाराज सुद्धा ब्राह्मणच होते”

‘…अन् 100 प्रवाशांनी भरलेली बोट क्षणात आडवी झाली’; पाहा काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More