बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चीन भारतावर सायबर हल्ला करण्याच्या तयारीत, अशी करा स्वतःची सुरक्षा!

नवी दिल्ली | भारत आणि चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरु आहेत. आता त्याचे परिणाम इंटरनेटवरही पहायला मिळण्याची शक्यता आहे. गलवान खोऱ्यात भारतीय जवानांवर हल्ला केल्यानंतर चीन आता भारतावर आणखी एक हल्ला करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.

दोन्ही देशांमधल्या वादाचा फायदा घेत चीनी हॅकर्स भारतावर हा हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. भारतातील महत्त्वाच्या केंद्रावर हा सायबर हल्ला केला जाऊ शकतो, असं मानलं जात आहे. यासाठी चीनी हॅकर्स मेल आयडीचा वापर करत असल्याचं समोर आलंय.

एबीपी न्यूजने या संदर्भात एक वृत्त दिलं आहे.  21 जूनला चीन भारतावर सायबर हल्ला करू शकतं. यासाठी चीनच्या हॅकर्सनी 20 लाख लोकांना ईमेलद्वारे टार्गेट करण्याचा प्लान केला आहे, असं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. यामध्ये एक ईमेल आयडीदेखील समोर आला आहे. त्यांसंबंधी काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

चीन भारताला सर्व प्रकारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत असल्याचं याद्वारे दिसतंय. हा सायबर हल्ला त्याचाच एक प्लॅन मानला जातोय. जेव्हाही दोन देशांमध्ये काही वाद होतात त्यावेळी दोन्ही बाजूने सायबर अटॅक झाल्याची अनेक उदाहरणं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चीनी हॅकर्स एका ईमेलच्या माध्यमातून भारतावर सायबर हल्ला करणार आहे. यामध्ये अनेक भारतीयांची खासगी आणि आर्थिक माहिती उघड होण्याची भीती आहे. चीनने भारतील रेल्वे आणि बँकिंग सिस्टम हॅक करण्यास सुरूवात केली असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यासाठी भारतानेही सायबर सुरक्षा वाढवली आहे.

दरम्यान, ‘ncov2019.gov.in’ या ईमेल आयडीने जर तुम्हाला कोणताही मेल किंवा फाईल्स आल्या तर त्या ओपन करू नका किंवा कोणताही रिप्लाय या मेलवर देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

याविषयी अधिक सांगायचं तर मोफत कोव्हिड-19 चाचणी संदर्भात हा मेल येत असल्याची माहिती आहे. त्यामुळे अशा धोक्यापासून सुरक्षित राहा, असं आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

गेल्या काही महिन्यांत ऑस्ट्रेलियामध्ये अनेक सायबर हल्ले झाले आहे. या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा संशय आहे. ऑस्ट्रेलियाने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीविषयी अनेकदा चौकशी करण्यास सांगितलं असता असं हल्ले अधिक तीव्र झाले असल्याचं समोर आलं आहे.

‘वारंवार होणाऱ्या सायबर हल्ल्यांसाठी चीनला जबाबदार धरलं जात आहे. या हल्ल्यामागे चीनचा हात असल्याचा पूर्ण विश्वास आहे’ असं ऑस्ट्रेलियन सरकारच्या सूत्रांनी शुक्रवारी सांगितलं. त्यामुळे भारतातील लोकांनी देखील अशा हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी तयार रहायला हवं.

ट्रेंडिंग बातम्या-

PM नरेंद्र मोदींच्या हस्ते गरीब कल्याण योजनेचा शुभारंभ; ‘या’ लोकांना मिळणार फायदा!

आता ‘या’ देशात अनोळखी माणसासोबत शरीरसंबंध ठेवता येणार नाहीत, कारण…

…म्हणून राज्यात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होतीये, आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा

महत्वाच्या बातम्या-

…म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, पत्रात केले ‘हे’ आरोप

सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर आता अभय देओलचा धक्कादायक खुलासा

…म्हणून नाशिक प्रशासनाने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिला घरीच थांबण्याचा सल्ला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More