बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुंबईतील त्या दिवशीच्या ‘बत्तीगुल’मागे चीनचा हात?’; ऊर्जा मंत्र्यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | गेल्या वर्षी 12 ऑक्टोंबरला मुंबईतील बत्तीगुलमागे चीनचा हात असल्याचा दावा अमेरिकेतील न्यूयॉर्क टाईम्सने केला आहे. यावर राज्याचे ऊर्जा मंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ऊर्जामंत्र्यांच्या वक्तव्याने आता मुंबईतल्या बत्तीगुलमागचं खरं सत्य समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मुंबईत बऱ्याच वेळासाठी वीज गेली तेव्हाच मी म्हणालो होतो की काहीतरी चुकीचं घडत आहे. त्यावेळीही मी 3 सदस्यांची समिती या प्रकरणाच्या चौकशीसाठी नेमली होती. आता माध्यमांमधून जे दावे केले जात आहेत त्यात तथ्य आहे असं मला वाटतं, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

सोमवारी संध्याकाळपर्यंत यावर सायबर सेल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे अहवाल सादर करणार आहे. त्यानंतर सत्य समोर येईल, असंही नितीन राऊत म्हणाले. गेल्या वर्षी भारत-चीनमधील द्वीपक्षीय संबंध ताणले गेले होते. दोन्ही देशांच्या सीमारेषेवर असलेल्या गलवानमध्ये भारतीय सैनिकांमध्ये आणि चीनी सैनिकांमध्ये धरपकड झाली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी 12 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या अनेक भागांमधली वीज दिवसभरासाठी गायब झाली होती. मुंबईतील काही भागत तर थेट दुसऱ्याच दिवशी वीज आली होती.

दरम्यान, न्यूयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृतानुसार रेकॉर्डेड फ्युचर या सायबर सेक्युरिटी कंपनीने याबाबतीत ब्लॉग प्रकाशित केला आहे. त्यामध्ये वीजपुरवठा करणाऱ्या यंत्रणेवरच हल्ला करणाऱ्या मालवेअरचा शोध लावल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता सायबर सेलकडून गृहविभागाला सादर होणाऱ्या अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

 

थोडक्यात बातम्या-

दम लगा के हैशा! मेरोलिनच्या पुशअप्स चॅलेंजवर राहुल गांधींचा दस का दम, पाहा व्हिडीओ

पुण्यातील ‘या’ ठिकाणी गजा मारणेला वडापाव खाणं पडलं महागात; झाला गुन्हा दाखल

‘पूजाच्या आई-वडिलांनी पाच कोटी घेतले’; शांता राठोडांच्या आरोपावर लहू चव्हाणांनी सोडलं मौन, म्हणाले..

‘जुनं ते सोनं’! इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी बैलगाडीतूनच केली नवरा-नवरीची पाठवणी!

संजय राठोडांनी आधीच राजीनामा दिला असता तर…- पंकजा मुंडे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More