Chinchwad Vidhan Sabha Election | पिंपरी- चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघांवर राष्ट्रवादी अजित पवार गटाने दावा केला आहे. चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. त्यामुळे या दोन जागांवरून महायुतीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवडच्या जागेवर भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या घरातच वाद असल्याचं समोर आलं आहे. अश्विनी जगताप यांचे दीर आणि पिंपरी चिंचवडचे भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी या जागेवर दावा केला आहे.
“लक्ष्मण जगतापांची मीच खरी उत्तराधिकारी”
भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या पत्नी अश्विनी जगताप (Ashwini Jagtap) यांच्या जागेवर दीर शंकर जगतापांनी दावा ठोकला आहे. पण लक्ष्मण जगतापांची मीच खरी उत्तराधिकारी आहे, असं म्हणत मी आगामी चिंचवड विधानसभा (Chinchwad Vidhan Sabha Election) लढणार असं ठामपणे अश्विनी जगताप म्हटलंय.
प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. ही लोकशाही आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांची उत्तराधिकारी मीच दावेदार असणार आहे. साहेबानंतर मलाच पक्षाने मान दिला होता. त्यानंतर साहेबांची जी कामे अपूर्ण होती, ती मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे, असं त्या म्हणाल्यात.
Ashwini Laxman Jagtap | शंकर जगताप निवडणूक लढवण्यास इच्छुक
राष्ट्रवादीने जरी भोसरी आणि चिंचवड विधानसभा क्षेत्रावर दावा केला असला तरी या दोन्ही जागा भाजपकडेच आहेत आणि भाजपकडेच राहतील. सध्या ज्या जागांवर ज्या पक्षाचा आमदार आहे. त्या जागा महायुती त्याच पक्षाकडे असतील असा फॉर्मुला महायुती ठरला आहे, असं ते म्हणाले.
मी स्वतः चिंचवड विधानसभा क्षेत्रातून भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे, अशी इच्छा शंकर जगताप यांनी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दारु पीऊन तो धिंगाणा आणि शिवीगाळ…’, Aishwarya Rai ने केला मोठा गौप्यस्फोट
समृद्धी महामार्गाची वर्षभरातच दयनीय अवस्था, पुलाला मोठं भगदाड पडल्याने 3 दिवसांत 4 अपघात
“हारकर जितने वाले को बाजीगर कहते है”, सुनेत्रा पवारांच्या बॅनरबाजीची जोरदार चर्चा
‘या’ गोष्टी बायकोसमोर करणं टाळा, अन्यथा पती होईल उद्ध्वस्त
‘त्या’ बॅनरमुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठी खळबळ; थेट राणेंना इशारा?