Top News

‘भारत आणि चीन हे दोन महान देश….’; चीननं भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

नवी दिल्ली | चीननं भारताला स्वातंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. चीनचे भारतातील राजदूत सुन विडोंग यांनी देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

भारतातील जनतेला स्वांतंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. प्राचीन वारसा असलेले भारत आणि चीन हे दोन महान देश शांततामय मार्गानं आणि परस्पर सहकार्यानं प्रगती करतील अशी अपेक्षा आहे, असं चीनचे भारतातील राजदून सुन विडोंग यांनी म्हटलंय.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीदेखील भारताला शुभेच्छा दिल्या. माझे चांगले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताच्या सर्व देशवासीयांना आनंदित करणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, भारत स्वातंत्र्य होऊन आज 74 वर्ष पूर्ण झाली. आज देशात उत्साहाचं वातावरण आहे. तसेच अनेक राष्ट्रांनी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि 130 कोटी देशवासीयांना शुभेच्छा दिल्या.

महत्वाच्या बातम्या-

‘ही’ भारतीय कंपनी खरेदी करू शकते टिकटॉक

पवार कुटुंबातील प्रश्न एका मिनिटात सुटेल- राजेश टोपे

कर्जबुडव्या विजय माल्ल्याच्या जीवनावर येणार वेबसिरीज

देशात मुलींच्या विवाहाची वयोमर्यादा बदलणार; पंतप्रधान मोदींकडून संकेत

“देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्ष गृहखातं सांभाळूनही….”; मुश्रीफांचा फडणवीसांना सणसणीत टोला

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या