Top News देश

अखेर चीन नमलं… गलवान खोऱ्यातीन चिनी सैन्य माघारी!

लडाख | गलवान खोऱ्यात गेले अनेक दिवस भारतीय आणि चीनी सैन्यांमध्ये तणावाचं वातावरण होतं. परंतू ते निवळण्यास आता हळूहळू सुरूवात झाली आहे. लडाखमध्ये चीनच्या सैनिकांनी मागे जाण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. गलवान येथून चिनी सैनिकांच्या गाड्या देखील मागे जात आहेत.

कॉर्प्स कमांडरच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे चीनची सैन्य वाहने, तंबू आणि सैनिक एक ते दोन किलोमीटरपर्यंत मागे हटले आहेत. पीएलए पीपी 14 येथून टेंट देखील काढण्याचं काम सुरु आहे.

 

 

चिनी सैन्य गलवान, हॉटस्परिंग आणि गोगरा सीमेवर मागे जाताना दिसत आहेत. चिनी सैन्य एक ते दोन किलोमीटर माघारी फिरले असले तरी चिनी सैन्य वाहने अजूनही या भागामध्ये आहेत.

दरम्यान, गेले काही दिवस भारताने चीनविरोधात अतिषय कठोर भूमिका घेतली होती. तसंच तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमू (लडाख) दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी भारतीय सैनिकांचं मनोबल वाढवताना चीनला कठोर इशारा दिला होता. विस्तारवादाचं युग संपून आता विकासवादाचं युग सुरू झाल्याचं त्यांनी चीनला सांगितलं होतं.

ट्रेंडिंग बातम्या-

शिवसेना-राष्ट्रवादीत फोडाफोडीचं राजकारण; पारनेरमध्ये शिवसेनेला, कल्याणमध्ये राष्ट्रवादीला दणका!

स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीची संधी तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज ‘महाजॉब्स’ वेबपोर्टलचे लोकार्पण

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात महापौरांपाठोपाठ उपमहापौर आणि सहा नगरसेवकांना कोरोनाची लागण

अजित पवारांच्या सूचनेनंतर पुण्याचे विभागीय आयुक्त ‘इन अ‌ॅक्शन मोड!’

हे सरकार नाही तर सर्कस आहे, नितेश राणेंचा महाविकास आघाडीवर टीकेचा बाण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या