Chinmayi Sripaada | प्रसिद्ध गायिका चिन्मयी श्रीपदा कायम कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असते. सोशल मीडियावर देखील चिन्मयी कायम सक्रीय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमी नवनवीन व्हिडीओ, पोस्ट शेअर करत असते. दरम्यान, चिन्मयीने X प्लॅटफॉर्मवर एका युजरला सुनावलं आहे. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
काय आहे प्रकरण?
एका युजरने लाखोंच्या संख्येनं कंडोमच्या विक्रीवर नाराजी व्यक्त केली होती. हल्लीच्या पिढीत व्हर्जिन मुली भेटणंच कठीण झाल्याचं, त्याने लिहिलं होतं. या ट्विटवरून चिन्मयी श्रीपदा Chinmayi Sripaada भडकली आणि तिने युजरला सुनावत म्हटलं, “तुझ्या आसपासच्या पुरुषांना सांग की लग्नाआधी सेक्स करू नका.” यावेळी तिने फक्त महिलांवर लागू होणाऱ्या नियमांच्या दुटप्पीपणाकडेही लक्ष वेधलं.
लग्नाआधी पुरुषांनी सेक्स करू नये-
दरम्यान, 1 जानेवारी 2025 रोजी एका युजरने आपल्या अधिकृत X प्लॅटफॉर्मवर “ब्लिंकिटच्या सीईओने आताच पोस्ट केलंय की काल रात्री कंडोमचे 1.2 लाख पार्सल डिलिव्हर करण्यात आले. हा आकडा फक्त काल रात्रीचा आणि फक्त ब्लिंकिटवरचा आहे. इतर ई-कॉमर्स साइट्स आणि मार्केट्समध्ये कंडोमची विक्री दशलक्षांमध्ये झाली असेल. या पिढीत लग्नासाठी व्हर्जिन मुलगी शोधणाऱ्यांना शुभेच्छा, असं म्हटलं आहे.”
Then men shouldn’t have premarital sex with women.
Unless said men are having sex with goats, dogs and reptiles. pic.twitter.com/sM3YJ3Myvg— Chinmayi Sripaada (@Chinmayi) January 1, 2025
त्यांनी केलेल्या या ट्विटवर चिन्मयीने Chinmayi Sripaada त्याला सुनवत म्हटलं की, मग पुरुषांनी लग्नाच्या आधीच स्त्रियांसोबत सेक्स करू नये. जोपर्यंत पुरुष शेळ्या, कुत्रे आणि सरपटणारे प्राणी यांच्याशी संभोग करत नसतील. महिलांना व्हर्जिन या शब्दाचं वेड नाही. पुरुष हे तसेही लैंगिकदृष्ट्या सक्रिय असतात असं महिलांना वाटतं आणि तुम्हा सर्वांनी सुरक्षित किंवा असुरक्षित सेक्स केलंय का हे विचारण्याची हिंमतसुद्धा ते करत नाहीत.
काही incel (ऑनलाइन कम्युनिटीचे असे सदस्य जे स्वत:ला लैंगिकदृष्ट्या स्त्रियांना आकर्षित करण्यास सक्षम सजमत नाहीत/ विशेषत: लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या महिला आणि पुरुषांबद्दल प्रतिकूल असलेल्या विचारांशी संबंधित) बंधूंना असं वाटतं की त्यांनी एखाद्या महिलेशी सेक्स करून तिला कायमचं दूषित केलंय. त्यामुळे पुरुषांना असा काही आजार असलाच पाहिजे ज्यातून त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करणारी स्त्री कधीही बरी होऊ शकत नाही आणि ज्यापासून इतर पुरुष घाबरतील.’
News Title : Chinmayi Sripaada slams on verginity girls statement
महत्त्वाच्या बातम्या –
पदभार स्विकारताचं एकनाथ शिंदे अॅक्शनमोडमध्ये; घेतला मोठा निर्णय
अखेर त्याने तोंड उघडलं! वाल्मिक कराडने मागितली तब्बल ‘इतक्या’ कोटींची खंडणी
तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संभाव्य यादी आली समोर
वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना ‘या’ जिल्ह्यात हलवा; भाजप आमदाराने केली मागणी
ऐकावं ते नवलच!, पुण्यात फक्त ३०० रुपयांत केलं लग्न