मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेत्या दिपाली सय्यद भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. अंगावर याल तर शिंगावर घेऊ, दिल्लीसमोर महाराष्ट्र झुकणार नाही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं होतं. त्यातच आता राज्यसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकारण चांगलंच तापलेलं असताना दिपाली सय्यद यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर जहरी टीका केली आहे.
चिरीट तोम्मय्या आमदार शिवसेनेला मतदान करतीलचं, पण विश्वास तुमच्यावर नाही, अशी घणाघाती टीका दिपाली सय्यद यांनी केली आहे. तसेच दिल्लीचा पैसा आंब्याच्या पेट्या सांगून हेलिकॉप्टरने उतरवाल यात शंका नाही. पाच वर्षे शिवसेनेची यात शिवसेना लढेलही आणि जिंकेलही, असं दिपाली सय्यद यांनी म्हटलं आहे. भाजपला फक्त महिलांवर हात उचलणं आणि जीवे मारण्याच्या धमक्या देणं, येवढंच येतं, असंही दिपाली सय्यद यांनी म्हटलेलं आहे.
दिल्लीतल्या बापाला प्रत्यत्तर केलं की, झोंबत असतं. जेव्हा किरीट सोमय्या बोंबलत फिरतात तेव्हा कमलाबाई कुठे लपून बसते. लबाड लांडगा ढोंग करतयं. महाराष्ट्र प्रेमाचं ढोंग करतय, अशी बोचरी टीका दिपाली सय्यद यांनी केली होती. महाराष्ट्र द्रोह्यांना भोसल्यांची लेक पुरून उरणार, असं दिपाली सय्यद म्हणाल्या आहेत.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्षेपार्ह भाषेमध्ये टीका केल्याने दीपाली सय्यद यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. वाढत्या महागाईवरून दिपाली सय्यद यांनी पंतप्रधानांवर टीका केली होती. त्यातच आता सर्वचं पक्ष राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आमदारांची जमवाजमव करत असताना शिवसेनेचे आमदार मतदान करतील, असं म्हणत दिपाली सय्यद यांनी किरीट सोमय्यांना लक्ष्य केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून ‘ही’ दोन नावं ठरली
“…असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”
मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर
“…म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात”
वाढत्या कोरोना रूग्णांमुळे आषाढी वारीवर निर्बंध येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…
Comments are closed.