बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हर एक का दिन आता है…हिसाब बराबर होगा’; चित्रा वाघ आक्रमक

मुंबई | विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात झालेल्या गोंधळाने भाजपच्या 12 आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. यावरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनीही सरकारवर टीका केली आहे. यासंदर्भात त्यांनी पोस्ट केली आहे.

संविधान बचावचे नारे देणारेच संविधानाचा, लोकशाहीचा गळा घोटत आहेत. 12 जणांचं निलंबन करून मुस्कटदाबी चालवली आहे. राज्याच्या जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल कारण ते जनतेचा आवाज सभागृहात उठवतं होते, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

लक्षात ठेवा हर एक का दिन आता है हिसाब बराबर होगा, असा म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारला इशारा दिला आहे. यासंदर्भात त्यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांचा माईक ओढला व धक्काबुक्की करत शिव्या दिल्या असा ठपका ठेवत आमदारांवर कारवाई देखील करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी घटना आहे. काही भाजपच्या नेत्यांनी बाहेर जाऊन सांगितलं की, मी भाजपच्या आमदारांना शिवीगाळ केली. जर मी शिवीगाळ केली असेल तर माझ्यावर जी कारवाई करायची असेल तर नक्की करावी, असं भास्कर जाधव म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“शरद पवार यांना असा मुख्यमंत्री कसा चालतो?”

“भास्कर जाधव यांचं नाव डांबराने लिहिलं जाईल”

मोठी बातमी! अखेर महाराष्ट्रात शाळेची घंटा वाजणार; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

हरभजन सिंग ‘या’ चित्रपटातून करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण!

एसईबीसी अंतर्गत येणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा केली ‘इतकी’ वर्ष; एमपीएससीबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More