Top News

हे तर महागायब सरकार!; चित्रा वाघ यांनी सांगितलं कोण कोण झालंय गायब

Photo Credit - Chitra Wagh/facebook & Uddhav Thackarey/Facebook

मुंबई | बीडमधील परळी वैजनाथच्या पूजा चव्हाण या तरूणीने 7 फेब्रुवारीला पुण्यातील एका इमारतीच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणात काही ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या होत्या. यामध्ये शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव जोडलं जात आहे. सरकारमधील मंत्र्याचं नाव थेट या प्रकरणात समोर आल्यामुळे प्रकरणावरून विरोधी पक्षाने सरकारवर टीका केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबत सर्वप्रथम ट्विट करून मंत्री संजय राठोड यांचं नाव उघडपणे घेतलं होतं. या ट्विटमध्ये त्यांनी मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर त्यांना धमकीचे फोन आल्याचा प्रकारही समोर आला. यानंतरही चित्रा वाघ यांनी पुन्हा ट्विट करत सरकारवर टीका केली आहे.

हे तर……महा गा य ब सरकार आहे. मंत्रालयातून मुख्यमंत्री गायब, पूजा प्रकरणातील मंत्री गायब, राज्यातून दोन्ही गृहराज्यमंत्री गायब, प्रत्यक्ष घटना बघणारे दोन्ही साक्षीदारही गायब; या सरकारमध्ये विकास कमी आणि भकास जास्त आहे. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असं ट्विट करत चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाची योग्य चौकशी होईल. यात जे कुणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय.

 

थोडक्यात बातम्या-

हे गरुडा, सांग त्या इंद्राला तुझ्या सिंहासनाला धोका झालाय; ‘त्या’ गुंडाचे फलक लावणारे पोलिसांनी फटकावले!

“तेंडुलकर आणि लतादीदींच्या चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही, लता मंगेशकर आमचं दैवत”

राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत कमालीची वाढ; गेल्या 24 तासांत ‘इतक्या’ हजार रूग्णांची नोंद

…तेव्हा तर काही केलं नाही, आता ढुसण्या मारणं बंद करा- अजित पवार

‘पूजा चव्हणाची हत्या नाही तर…’; धनंजय मुंडेंचं पूजाच्या आत्महत्येबाबत मोठं वक्तव्य!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या