Chitra Wagh | राज्यभरातील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाले आहेत. यावरून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींनी पटकन बँक खात्यातून काढून घ्यावे, असं म्हणत सरकारला डिवचलं. आता यावरून भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
माझ्या बहिणींना विनंती करते, तुम्ही पटकन बँकेतून पैसे काढून घ्या. कारण का तर भारतीय जनता पक्षाचे दोन-दोन लोक म्हणत आहेत की, आम्ही पैसे परत घेऊ. ज्यांच्या अकाऊंटला पैसे आले, अशा सर्व महिला भगिनींना माझी विनंती आहे की, पैसे काढून घ्या. या सरकारचे काही सांगता येत नाही, अशी टीका सुप्रिया सुळेंनी केली होती. सुप्रिया सुळेंच्या या टीकेवर चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
चित्रा वाघांनी सुप्रिया सुळेंना झापलं
मोठ्ठ्या ताई तुम्ही आयुष्यभर बोटं मोडत बसा. या योजनेबाबत त्यांनीच काय तर महाबिगाडीच्या नेत्यांनी अपप्रचार सुरु केला आहे. खरे तर, या योजनेचे खुल्या दिलाने त्यांनी स्वागत करायला हवं होतं. मात्र त्यांनी आपली विकृत मनोवृत्ती दाखवून दिली, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिलं.
महायुती सरकारने जाहीर केल्याप्रमाणे लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणे सुरू झाले आणि बारामतीच्या मोठ्ठ्या ताईंची पोटदुखी पुन्हा समोर आली. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्याने केलेले बघवत नाही, अशी त्यांची अवस्था आहे, असंही चित्रा वाघ म्हणाल्यात.
Chitra Wagh | टोळक्यांपासून सावध राहा- चित्रा वाघ
माझी राज्यातील तमाम महिला वर्गाला विनंती आहे, अपप्रचार करणाऱ्या या मोठ्ठ्या ताईंपासून आणि त्यांच्या टोळक्यांपासून सावध राहा, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
माघार की नवा डाव?; बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचा धक्कादायक निर्णय
लाडक्या बहिणींना वेळेआधीच पैसे!, मंत्री अदिती तटकरेंनी दिली महत्त्वाची माहिती
‘या’ विभागात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! ’31ऑगस्टपर्यंत करा अर्ज
कोलकाता ‘निर्भया कांड’वर आयुष्मान खुराणाची पोस्ट; व्हिडिओ पाहून तुमचंही मन सुन्न होईल
SBI ने करोडो ग्राहकांना दिला झटका, MCLR वाढवला, EMI एवढ्याने वाढणार