मुंबई | माजी मंत्री आणि भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी महिला तहसीलदाराबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. विरोधकांनी लोणीकरांवर टीकेची झोड उठवली आहे. यातच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून लोणीकरांचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हटलं आहे.
बबनराव लोणीकर यांच्या वक्तव्याचं समर्थन करणार नसून त्यांचं वक्तव्य आक्षेपार्हच असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद येथे पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.
पक्ष कोणताही असो राजकीय नेत्यांनी भाषण करताना शब्दांचा वापर जपून करावा. आपण काय बोलत आहोत याचं भान ठेवावं. लोणीकरांच्या वक्तव्याचं समर्थन करता येणार नाही. या प्रकरणी महिला आयोग निश्चितच दखल घेईल, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.
दरम्यान, एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना बबनराव लोणीकरांनी ‘शेतकऱ्यांच्या मोर्चाला गर्दी जमवण्यासाठी आपण हिरोईन आणू, कोणी मिळालं नाही तर तहसीलदार मॅडम आहेतच, असं वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.
ट्रेंडिंग बातम्या-
लोणीकर, तुमच्यासारख्या व्हिलनचा सुपडा साफ करायला वेळ लागणार नाही- रुपाली चाकणकर
तहसीलदारबाई हिरोईनसारख्या दिसतात म्हणणाऱ्या लोणीकरांची सारवासारव, म्हणतात…
महत्वाच्या बातम्या-
मराठा तरुणांंचा ‘मातोश्री’बाहेर आत्मदहनाचा इशारा
“शून्याचा शोध आर्यभट्टने लावला अन् लोकांच्या हाती शून्य देण्याचा इतिहास भाजपच्या नावावर”
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा अखेरचा तोडगा नाही- शरद पवार
Comments are closed.