बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मी काय आहे काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा- चित्रा वाघ

मुंबई | तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपानंतर आमदार निलेश लंके अडचणीत सापडले होते. या प्रकरणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं.

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो. अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली.

मेहबूब शेख यांनी केलेल्या टीकेला चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. वाघावर…..कोल्हे कुत्रे भुंकताहेत. कारण मी पिडीतांच्या पाठीशी उभी रहाते म्हणून. तसेच सत्तेच्या जोरावर गुन्हे दाखल करून झाले आता माझ्या परीवाराची बदनामी सुरू आहे, असं चित्रा वाघ यांनी म्हटलंय.

मी काय आहे….काय नाही हे तुमच्या बापाला जाऊन विचारा आणि मग या वाघ आहे मी लक्षात ठेवा….कोल्ह्या कुत्र्यांना घाबरणारी नाही, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी मेहबूब शेख यांना सुनावलं आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

नोकरी मिळवण्यासाठी पठ्ठ्याची भन्नाट कल्पना; केलं असं काही की…, पाहा व्हिडीओ

करुणा शर्मांनी धनंजय मुंडेंवर केले गंभीर आरोप, म्हणाल्या…

वळणाचं पाणी वळणाला गेलं, तालिबानच्या मदतीला पाकिस्तान धावलं, पंजशीरवर पाकिस्तानचा हल्ला!

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूची दहशत, मुलाच्या मृत्यूनं चिंतेत वाढ!

“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More