बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ही मंडळी भ्याडच म्हणावी लागतील’; चित्रा वाघ यांचं रूपाली चाकणकरांना प्रत्युत्तर

मुंबई | अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. देशमुखांनी तर राजीनामा दिला आता प्रश्न आहे की नवा वसूली मंत्री कोण?, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली होती. याला चाकणकरांनी प्रत्युत्तर देत चित्रा वाघ यांच्यावर सडकून टीका केली आहे.

ताईंचा नवरा स्वतः भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात अडकलेला आरोपी असून त्यांच्यावर रीतसर गुन्हा दाखल आहे आणि ताई विचारत आहेत नवीन वसुली मंत्री कोण??अहो ताई भावनेच्या भरात इतकंही वाहून जाऊ नका की अंगलट आलं की परत ‘पवार साहेब माझ्या वडिलांसारखेच आहेत’ हे म्हणायची वेळ येईल.थोडा धीरज रखो , सब सच सामने आयेगा.!!, अशी टीका चाकणकरांनी केली होती. याला चित्रा वाघ यांनी ट्विट करत चाकणकरांना चांगलेच खडेबोलत सुनावले आहेत.

अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, अशी बोचरी टीका चित्रा वाघ यांनी अप्रत्यक्षपणे रूपाली चाकणकरांवर केली आहे.

सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकरांना दिला आहे.

थोडक्यात बातम्या- 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं, म्हणाले…

गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान थांबेना; आज दिवसभरातील आकडेवारी चिंताजनक

11 एप्रिलपासून तुमच्या कार्यालयातच कोरोना लस मिळणार, केंद्राकडून राज्यांना तयारीचे आदेश

‘ही’ 3 लक्षणं असतील तर सावध व्हा; कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची लक्षणं आली समोर

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More