बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पोलिस सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले गेले म्हणूनच अशा घटना वाढत आहेत”

पंढरपूर | भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शुक्रवारी पंढरपूर येथे जाऊन अल्पवयीन मुलीच्या बलात्कार घटनेप्रकरणी पंढरपूर पीआयची भेट घेतली. यावेळी त्यांनी पीडीत मुलगी आणि तिच्या आईचे समुपदेशन व्हावे आणि महिला पोलिस पाठवून पीडीतेचा पुरवणी जबाब नोंदवून घ्यावा, अशी मागणीही त्यांनी पंढरपूर पीआयकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार समाधान अवताडेही उपस्थित होते.

चित्रा वाघ यांनी पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली. या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यात सत्तेवर असलेल्या ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. अनेक शहरामध्ये, गावामध्ये खून, अपहरण, बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा वाढत्या घटनांमुळे राज्यातील लेकी बाळींची सुरक्षितता धोक्यात आली आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

तर दिवसाढवळ्या महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार होत आहे, असा घणाघातही चित्रा वाघ यांनी केला आहे. अशा घटनांमधील आरोपी मोकाट फिरतात. पोलिसांचा निर्ढावलेल्या गुन्हेगारांवरचा वचक कमी झाला असल्याचा घणाघाती आरोपही चित्रा वाघ यांनी यावेळी केला आहे. या सगळ्या घटना बघता पोलिस डिपार्टमेंट सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधल्यासारखं काम करत आहेत, अशी खोचक टीकाही चित्रा वाघ यांनी केली.

तर कायदा व सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघालेले मी आजपर्यंत पाहिले नाहीत, असा गंभीर आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. तर लोकांना फक्त भूलवायचं, अशी कोणती केस झाली की उभंं राहायचं आणि एकच घोषा लावायचा की ही केस फास्ट्रॅकमध्ये देऊ. हे एकाच विषयावर गंभीर आहेत की यांचं सरकार खंबीर आहे, असा घणाघातही चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर केला आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

आर्यनच्या सुटकेनंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचं शाहरुखसाठी खास ट्विट, म्हणाली…

UPSC पूर्व परिक्षेचा निकाल जाहीर! मुख्य परिक्षेसाठी पुन्हा भरावा लागणार अर्ज

अखेर आर्यन खानची सुटका, 27 दिवसानंतर तुरुंगांबाहेर

काय सांगता! पेट्रोल चक्क 121 रुपये प्रतिलिटर, सर्वसामान्यांचा जीव मेताकुटीला

” हे बघुन तुमच्या तरी घशाखाली घास उतरतोय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More