‘असे कितीही आडवे आले तरी…’; चित्रा वाघ सुषमा अंधारेंवर बरसल्या

मुंबई | आमची नक्कल करून त्या टाळ्या आणि शिट्ट्या मिळवतात. आमची नावे घेऊन त्यांचे दुकान चालत असेल तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहे, असं प्रत्युत्तर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना दिलंय.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी महाप्रबोधन यात्रेदरम्यान भाजपवर सडकून टीका केली होती. यावा चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होत्या

असे कितीही आडवे आले तरी आम्हाला काही फरक पडत नाही. आमचं नाव घेऊन त्यांचं दुकान चालत असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत, असंही चित्रा वाघ (Chitra Wagh) म्हणाल्यात.

मागील अडीच वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काय दिवे लावले हे जरा महाराष्ट्राला सांगा. त्यांच्या प्रत्येक विधानावर बोललेच पाहिजे, असं काहीही नाही. त्या त्यांचं काम करत आहेत, आम्ही आमचे काम करत राहू, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.

राज्य, केंद्र सरकार कित्येक योजना राबवत आहे. आता सर्वांनाच शेतकरी आठवत आहे. आता ते शाताच्या बांधावर जात आहेत. सत्तेत असताना अडीच वर्षे ते झोपले होते, अशी टीकाही त्यांनी केलीये.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला सुषमा अंधारे काय प्रत्य़ुत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More