बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“देवेंद्रजी काय राव तुम्ही कधीही मदतीला पोहोचता, मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना”

मुंबई | वादळात झालेल्या नुकसानाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून मुख्यमंत्री केवळ चार तासांसाठी कोकणचा दौरा करत आहेत, अशी टीका भाजपकडून केली जात आहे. आता या दौऱ्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

देवेंद्र फडणवीसजी काय राव तुम्ही…थेट दुष्काळी भागात लोकांच्या मदतीला पोहोचता…मग इथे मुख्यमंत्र्यांनाही निघावं लागतं ना, असा टोला चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. चित्रा वाघ यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

3 तासाच्या कोकणदौऱ्यात त्यांनी किती गावांना भेटी दिल्या किती सात्वंन केलं, हे सगळ कृपा करून विचारू नका..आणि हो पर्यटन फोटोसेशन 3 तासात शक्य नाही म्हणून रद्द केलं आहे, अशी खोचक टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्र्यांकडून केवळ एका ठिकाणी फेरफटका, वादळग्रस्तांची भेट नाही, नुकसानीचा पाहणी दौरा रद्द. तसेच जितका वेळ मुख्यमंत्री कोकणात आले त्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो, अशी बोचरी टीका माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे. वादळामुळे उध्वस्त झालेल्या कोकणी माणसाला खरी गरज होती ती त्याचे दुःख जाणून घेण्याची. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तेच केलं. शिवसेनेचे मुख्यमंत्री कोकण भेटीचा मुहूर्त शोधेपर्यंत फडणवीस आले, संकट सोसलेल्या इथल्या लोकांना भेटले आणि त्यांची व्यथा प्रत्यक्ष जाणून घेतली, असं निलेश राणे म्हणाले.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘कोरोनामुळे आपण जवळची माणसं गमवलीत’; डॉक्टरांशी संवाद साधताना मोदी झाले भावूक

“सरकार आल्यापासून हवेत गेलेले उद्धव ठाकरेंचे पाय जमिनीवर आले, आनंद आहे”

धक्कादायक! डिस्चार्ज मिळण्याच्या काही तासांपूर्वी कोरोना रुग्णाची रुग्णालयातच आत्महत्या

सराईत गुन्हेगारांना फेसबुक पोस्ट महागात; पिंपरीतील ‘भाईचा बड्डे’ थेट पोलीस कोठडीत

“मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापेक्षा जास्त वेळ माणूस आंघोळीला घेतो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More