बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ही कोणाची जबाबदारी?”

मुंबई | मुंबईत 104 टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेने केलेला असतानाच पहिल्याच पावसात मुंबई तुंबली आहे. रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णपणे ठप्प झाली आहे. यावरून भाजपने मुंबई महानगरपालिका तसेच ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर चारोळीतून निशाणा साधला आहे. ‘पावसाच्या येता सरी…मुंबई पाण्याने भरी…मुख्यमंत्री बसले घरी, मुंबईची जनता विचारी ‘ही’ कुणाची जबाबदारी ?, असा टोला चित्र वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

शिवसेनेनं केलेले सर्व दावे पहिल्याच पावसात फोल ठरले असून मुंबई शिवसेनेनं तुंबवून दाखवली आहे. तसेच आता राज्य सरकार बहुतेक पावसाची जबाबदारीही मोदींवरच ढकलेल, अशी टीका भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई महानगरपालिकेने आज मुंबई तुंबवून दाखवली आहे. मुंबईतील नालेसफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचे आम्ही आधीपासून सांगत होतो. ती बाब आता आज उघड झाली आहे. आता राज्य सरकारकडून पावसाची जबाबदारीही आता बहुतेक मोदींवर ढकलली जाईल. आता मोदींनीच त्यातून मार्ग काढावा असं राज्य सरकारने म्हणू नये अशी आमची अपेक्षा आहे, असा टोला अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

‘50% लहान मुलांच्या शरिरात कोरोना अँटीबाॅडी’; लसीच्या चाचणीपुर्वी धक्कादायक खुलासा

“तरुणाने भररस्त्यात फ्रान्सच्या अध्यक्षांच्या श्रीमुखात मारली, जनतेच्या संयमाचा कडेलोट होऊ देऊ नका”

…म्हणून वयाच्या अटीमध्ये बसत नसून देखील फडणवीसांच्या पुतण्याला लस दिली गेली!

राज्यातील ‘या’ जिल्ह्याला रेड अलर्ट जारी; पुढील 24 तास पाऊस झोडपून काढणार

मुंबईतील मालाड भागात चार मजली इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटना, 9 जणांचा मृत्यू, 8 जण गंभीर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More