बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“मोदी गुजरात दौऱ्यावर तर फडणवीस कोकण दौऱ्यावर, मुख्यमंत्री साहेब तुम्ही मुंबईचा तरी करा”

मुंबई | गेल्या तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातचा हवाई पाहणी दौरा करणार आहेत. तसेच तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही विरोधी पक्षनेते कोकण दौऱ्यावर आहेत. यावरून भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

तौक्ते वादळाने झालेलं नुकसान, त्यासाठीची मदत व सर्वात महत्वाचे लोकांना आधार देण्यासाठी पंतप्रधान गुजरातमध्ये आहेत. तर विरोधी पक्षनेता देवेंद्र फडणवीस हे कोकणात पोहोचलेत. मग, मुख्यमंत्री साहेब तुम्ही आमचे कुटुंबप्रमुख आहात किमान मुंबईत तरी दौरा करा, असा टोला चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातही तोक्ते वादळ आलं मग महाराष्ट्राबाबत पंतप्रधान भेदभाव का करत आहेत. महाराष्ट्रातही तौक्ते वादळ येऊन नुकसान करुन गेले आहे. मग, महाराष्ट्राचा दौरा पंतप्रधान का करत नाहीत, असा सवाल नवाब मलिक यांनी ट्विट करुन उपस्थित केला आहे.

 

 

 

थोडक्यात बातम्या- 

3 वर्षाच्या चिमुकलीसह विवाहितेची विहिरीत उडी; बुलडाण्यातील मायलेकीच्या आत्महत्येने खळबळ

कोरोना नष्ट करण्यासाठी भाजप नेत्याचा शंखनाद, यज्ञ कुंड घेऊन थेट रस्त्यावर उतरले, पाहा व्हिडीओ

‘दोन हजार दे तुझी गाडी सोडतो’; पोलिसाचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; पदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय तूर्तास मागे

दगडाने ठेचून तरुणाची हत्या; भारती विद्यापीठ परिसर पुन्हा हादरला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More