“चोरांना आणि त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल”
मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक विषयांवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपच्या अनेक मुद्द्यावरुन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता संजय राऊतांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर टीकेची तोफ डागली आहे.
चित्रा वाघ यांनी ट्विट करत ‘सर्वज्ञानी संजय राऊतांच्या बोलण्यातून चोराच्या मनात चांदणं दिसतंय’, असं म्हणत महाविकास आघाडीला आयकर विभाग आणि ई़डीची एवढी भीती का वाटतेय, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महाविकास आघाडी विरूद्ध भाजप असा वाद पेटल्याचं दिसून येतंय.
‘हे अलीबाबा आणि 40 चोरांचं सरकार, चोरांना व त्यांच्या सरदारांना हिशोब द्यावाच लागेल’, असा घणाघाती हल्ला चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडीवर चढवला आहे. त्यामुळे केेंद्रीय यंत्रणांच्या महाराष्ट्रात होणाऱ्या कारवाई व धाडसत्रावरून राजकारण चांगलंच पेटलं असल्याचं पाहायला मिळत आहे.
दरम्यान, केंद्रीय यंत्रणांनी जनतेला लूटणाऱ्या टोळीविरोधात सर्जिकल स्ट्राईक सुरू केला आहे. असं चित्रा वाघ यांनी ट्विटरवरून ट्विट करत होत असलेल्या कारवाई व धाडसत्राचं समर्थन केलं आहे.
थोडक्यात बातम्या –
भाजपला मोठा धक्का; ‘या’ दोन मोठ्या नेत्यांचा पक्षाला रामराम
“पवारांचा एकेरी उल्लेख करणं पाटलांना शोभतं का? कुठे हिमालय, कुठे टेकाड टेंगूळ”
“ईडी, सीबीआय यांच्यासह किरीट सोमय्यांना जम्मू-काश्मिरला पाठवा”
‘निवडणूक जिंकण्यासाठी पैसे वाटले, खायला मटन मासे पुरवले’; शिवसेना आमदाराचा गौप्यस्फोट
“यंत्रणांच्या धाडीमुळे महाराष्ट्र कधीच मागे हटणार नाही, तो अशा गोष्टींसमोर झुकत नाही”
Comments are closed.