बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“महिला आयोगाला अध्यक्ष मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका”

मुंबई | महाराष्ट्र राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर यांचं नाव जवळपास निश्चित करण्यात आलं आहे. परंतु चाकणकर यांचे नाव हे भाजप नेत्या चित्रा वाघ यांना रुचलेलं दिसत नाही, तसेच त्यांनी सकाळी ट्विट करून रुपाली चाकणकर यांच्या नावाला विरोध दर्शवत सडकून टीका केली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्ष निवडण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात मागणीने जोर धरला होता. तसेच महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत महाराष्ट्रात वाढ झाल्याने आयोगाला अध्यक्ष नेमण्याची गरज असल्याचं देखील बोललं जात होतं. त्यातच आता रूपाली चाकणकर यांचं नाव चर्चेत आलं आहे.

दरम्यान, आयोगाचा अध्यक्ष लवकरात लवकर नेमण्यात यावा, पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी एखादी अनुभवी व्यक्ती मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी शुर्पणखा तरी बसवू नका, अन्यथा प्रत्येक वेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, अशा शब्दात बोचरी टीका चित्रा वाघ यांनी सकाळी ट्विट करून केली आहे.

‘महिलांचं शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरतात पण राज्यातील महिला आयोगाला मात्र अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे’, असे म्हणत चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारवरही निशाणा साधला आहे. या सर्व प्रकरणामुळे आता चित्रा वाघ विरुद्ध रुपाली चाकणकर असा वाद पुन्हा एकदा रंगण्याची चिन्हे दिसून येत आहे.

थोडक्यात बातम्या

“पुन्हा आकडेबाजी आणि जुमलेबाजी हा तर केंद्र सरकारचा नेहमीचा खेळ”

पेट्रोल-डिझेलचे दर पुन्हा वाढले; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री मात्र कायम

पाकिस्तानची आर्थिक स्थिती दयनीय, इतर देशांनी कर्ज नाकारल्याने निघणार दिवाळं

ऑनलाइन मद्य खरेदी करणं महिलेला पडलं महागात, बसला लाखोंचा गंडा

आर्यन खानची कोठडी आज तरी संपणार का? जामीन अर्जावर आज परत सुनावणी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More