“फक्त राजीनामा नव्हे…” चित्रा वाघ यांच्या ‘या’ नव्या मागणीने संजय राठोडांचा पाय आणखी खोलात!
मुंबई | | परळी वैजनाथ येथील रहिवासी असणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यातील महंमदवाडी येथे आत्महत्या केली होती. त्य़ानंतर दिवसेंदिवस या प्रकरणात नवनवीन माहिती समोर आली. या माहितीच्या आधारे भाजपने वनमंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप केल्यानंतर आज संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला आहे. याप्रकरणात भाजपकडून वारंवार सरकारला धारेवर धरणाऱ्या चित्रा वाघ यांनी आता आणखी एक मोठी मागणी केली आहे.
संजय राठोड यांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नाही, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. ऑडियो क्लिप आणि इतर सारे पुरावे असूनही संजय राठोड यांना अटक का केली नाही? असाही सवाल त्यांनी सरकारला विचारला आहे.
संजय राठोडने केवळ राजीनामा द्यावा हे ध्येय नाही. त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत. एफआयआर, ऑडियो क्लिप आणि इतर सर्व पुरावे समोर असताना पोलीस कोणाच्या दबावाखाली आहेत?, महिलांच्या सुरक्षेचा विषय हा राजकारणाच्या पलिकडचा विषय आहे, असं म्हणत चित्रा वाघ यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
दरम्यान, भाजप नेते अतुल भातखळकर यांनीदेखील संजय राठोड यांना अटक व्हावी अशी मागणी केली आहे. त्यामुळे आता संजय राठोडांनी राजीनामा दिला असला तरीही पूजा चव्हाण प्रकरणातील वाद आता अजून वाढणार असल्याचं दिसत आहे.
थोडक्यात बातम्या-
संजय राठोडांनंतर धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणार का?; फडणवीसांनी दिलं आश्चर्यचकीत करणारं उत्तर
भाजपनं अतिशय घाणेरडं राजकारण केलं, या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी- संजय राठोड
राजीनामा दिला म्हणजे हे प्रकरण संपलं असं होत नाही- प्रविण दरेकर
“जे उद्धव ठाकरेंनी केलं ते शरद पवारांनीही करावं, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा”
राजीनामा देतो, फक्त… संजय राठोड यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ एक विनवणी
Comments are closed.