मुंबई | बी़ड जिल्ह्यातील परळी वैज्यनाथ येथील रहिवाशी असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यातील महंमदवाडी परिसरातील हेवन पार्क सोसायटीतील इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या केली. शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात आल्यानंतर विरोधकांनीही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला असून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी याबाबत सर्वप्रथम ट्विट करून मंत्री संजय राठोड यांचं नाव उघडपणे घेतलं होतं.
भाजप नेत्या आणि महिला प्रदेशआध्यक्षा चित्रा वाघ यांनी याबाबत शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्याविरोधात मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी केली होती. यामुळे चित्रा वाघ यांना अनेक जनांनी फोन करुन धमकवण्याचा प्रयत्न केला, त्याला उत्तर देत धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगाच मला फोनकरून वेळ वाया घालवू नका, जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारच असं म्हटलंय.
याप्रकरणात राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारले असता तसेच ज्या घरातील व्यक्ती किंवा कुटुंबाीतील व्यक्ती आत्महत्या करते. त्या घरातील व्यक्तीला चिंता असते. इतरांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही, असं म्हणत विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला होता. याला देखील चित्रा वाघ यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, अजून कुठवर आणि किती बलात्काऱ्यांना पाठीशी घालणार? कुणाचं तरी लेकरू गेलयं थोडी लाज असू द्या, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.
धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो
जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं👊@BJP4Maharashtra @MumbaiPolice @MahaPolice
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) February 14, 2021
थोडक्यात बातम्या-
“प्रियंका गांधी दुर्गेचा अवतार, त्यांच्या हातूनच भाजपचा वध होणार”
तो मरता मरता वाचला, म्हणतो टाटानेच केला चमत्कार!
“माझी सत्ता, माझी मनमानी असा राज्य सरकारचा कारभार चाललाय”
टिकटाॅक युजर्ससाठी खूशखबर, भारतात टिकटाॅक पुन्हा होणार सुरू??
…मग कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त होतंय ते उद्धव ठाकरेंना कळेल- देवेंद्र फडणवीस