बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“खुर्ची इतकी वाईट आहे का, की ज्या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही”

नाशिक | शिवसेना नेते संजय राठोड यांच्या विरोधात भाजप चित्रा वाघ राजकीय आखाड्यात उतरल्या आहेत. त्यानंतर चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. त्यानंतर चित्रा वाघ आणखी आक्रमक झाल्या आहेत.

साहेब हे सर्व एकजात सारखेच आहेत. आम्हाला फक्त तुमच्याकडूनच अपेक्षा आहेत. तुमच्यावर कोणाचा दबाव तर नाही ना?, असा खोचक प्रश्न चित्रा वाघ यांनी केला आहे. साहेब ही खुर्ची इतकी वाईट आहे का ? की या खुर्चीपुढे बाईची इज्जत राहिली नाही. आपण शिवरायांचा महाराष्ट्र म्हणता ना, तर मग तो कृतीतून दाखवायची वेळ आली आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

मुख्यमंत्र्यांची प्रतिमा चांगली आहे. त्यांंचं व्यक्तीमत्व सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. मुख्यमंत्री कारवाई करतील अशी अपेक्षा आहे. संजय राठोडवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

संजय राठोडांचा राजीनामा घेईपर्यंत आम्ही मागे हटणार नाही, आम्ही तोपर्यत लढत राहणार आणि बोलत राहणार. आम्ही आवाज उठवला म्हणून केस टाकल्या. कितीही केस टाकल्यातरी आम्ही प्रश्न विचारत राहू, ही चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेल, असं चित्रा वाघ म्हणाल्या.

थोडक्यात बातम्या-

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

शरद पवार माझा बापच आहे, मला आज त्यांची आठवण येतीये- चित्रा वाघ

…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More