बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुण्यातील ‘त्या’ क्रुर घटनेवरून चित्रा वाघांना संताप अनावर, म्हणाल्या…

पुणे | काल पु्ण्यातील बिबवेवाडी परिसरात राहणाऱ्या एका आठवीत शिकणाऱ्या शाळकरी मुलीचा भरदिवसा निर्घृण खून करण्यात आला. त्यामुळे पुणे शहर आणि एकूणच महाराष्ट्र चांगलाच हादरला आहे. महाराष्ट्रात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं असताना आता त्यात या घटनेमुळे आणखी भर पडली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या घटनेवरून सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले आहेत.

महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडुन आरोप करताना महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत, असं बोललं जात होतं. तसेच गेल्या काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनात वाढ होत आहे. ‘महाराष्ट्रातील सावित्रीच्या लेकींचा रोज बळी जातोय, यांच्यासाठी सरकार कधी करतंय महाराष्ट्र बंद?’, असं म्हणत चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना त्यांनी असंही म्हटलं की, ‘पुण्यात नेमकं चाललंय काय?, पोलिस कायदे फक्त कागदावर आणि कायदा व सुव्यवस्था वाऱ्यावर’, त्यामुळे घडलेल्या घटनेवर त्यांनी संताप व्यक्त करत आपल्या भावना समाजमाध्यमावर मांडत राज्य सरकार आणि पोलिस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

बिबवेवाडी परिसरात कब्बडीचा सराव करत असताना संबंधित मुलीच्या अंगावर सपासप कोयत्याने वार करत आरोपीने अत्यंत निर्दयीपणे त्या निष्पाप मुलीचा बळी घेतला. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. तसेच नागरिकांकडून कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

थोडक्यात बातम्या

महाविकास आघाडीतील धुसफुस पुन्हा चव्हाट्यावर, वडेट्टीवार ‘या’ कारणामुळे नाराज

“दसऱ्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला सुरूवात; आम्ही पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवणार”

…अन् भाजप उमेदवाराला पडलं फक्त ‘1 मत’; खुद्द परिवाराने फिरवली पाठ

”जवा गातीस तू एक गाणं, मला अजून मुख्यमंत्रीच असल्यासारखं वाटतंय”

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी! शरद पवारांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More