बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम; भाजपकडून ‘या’ उमेदवाराला संधी

मुंबई | भाजप नेत्या चित्रा वाघ महिला अत्याचाराच्या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेत वेळोवेळी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत उमेदवार म्हणून चित्रा वाघ यांच्या नावाची जोरदार चर्चा रंगली होती. मुंबई विभागातून भाजपच्या वतीने चित्रा वाघ यांना संधी दिली जाण्याची शक्यता होती. पण चित्रा वाघ यांची आमदारकीची संधी हुकली आहे

आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून पाच उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. धुळ्यातून अमरिश पटेल, कोल्हापूर येथून अमन महाडिक, अकोल्यातून वसंत खंडेलवाल तर नागपूर येथून चंद्रशेखर बावनकुळे यांची नावं जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विभागातून चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा होती. पण भाजपकडून राजहंस सिंह यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

पुजा चव्हाण मृत्यू प्रकरणानंतर चित्रा वाघ यांनी राज्य सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यानंतर संजय राठोड यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महिला अत्याचाराच्या घटनावरून चित्रा वाघ वेळोवेळी ठाकरे सरकारची कोंडी करताना दिसल्या आहेत. त्यामुळे मुंबई विभागातून चित्रा वाघ यांच्या नावाची चर्चा सुरू होती. पण दिल्लीत चित्रा वाघ यांचं नाव यादीतून वगळण्यात आलं.

मुंबई महापालिकेत सध्या शिवसेेनेचं वर्चस्व आहे. त्यात मुंबई विभागात मराठी मतदारांचा कौल हा शिवसेनेकडे असतो. त्यामुळे मराठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्याऐवजी राजहंस सिंह यांना संधी दिली आहे. राजहंस सिंह यांना उमेदवार म्हणून नेमताना भाजपने उत्तर भारतीय मतदारांचं मत विचारात घेतलं आहे. राजहंस सिंह यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर चित्रा वाघ यांच्या आमदारकीच्या चर्चांना पूर्णविराम लागला आहे.

थोडक्यात बातम्या-

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर लाईक्सचा वर्षाव! ‘या’ हिट गाण्याचा केला रिमेक

“पण हे कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार”

Mr 360 चं वर्तुळ पुर्ण; महान खेळाडू एबी डिव्हिलीयर्सची क्रिकेटमधून निवृत्ती

“अन्नदात्यांना खलिस्तानी, देशद्रोही म्हणल्याबद्दल नरेंद्र मोदींनी माफी मागावी”

‘मुंबईतील ते बार समीर वानखेडेंच्या मालकीचं?’; नवाब मलिकांच्या नव्या दाव्याने खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More