जालना | बीड जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने एका महिलेवर अत्याचार केला आहे, असा धक्कादायक आरोप राष्ट्रवादीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केलाय. त्या जालन्यात पत्रकारांशी बोलत होत्या.
पीडित महिलेनं पोलीस ठाण्यापासून ते आयुक्तांपर्यंत धाव घेतली, मात्र तिला न्याय मिळाला नाही. अखेर याप्रकरणी तिने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. याप्रकरणी 26 जुलैला सुनावणी होणार असून त्यानंतर आपण त्या आमदाराचं नाव जाहीर करु, असं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, भाजपच्या राज्यात महिला अत्याचाराचं प्रमाण वाढलं आहे. मोर्चे काढून या सरकारवर परिणाम होत नाही. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, असंही त्या म्हणाल्या.
महत्त्वाच्या बातम्या–
-मुंबईचा दूध पुरवठा तोडण्यासाठी आता हार्दिक पटेल मैदानात…
-…ते दोन हिरो कुठेच जाताना दिसत नाहीत- चित्रा वाघ
-क्षणात नोटाबंदी करता, मग राम मंदिर का नाही?- उद्धव ठाकरेंचा सवाल
-भाजप-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य!
-शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये