Top News

एक आई म्हणून हैदराबाद कारवाईचं समर्थनचं- चित्रा वाघ

पुणे | हैदराबाद सामुहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपींना पोलिसांनी ठार केलं आहे. या प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. एक आई म्हणून हैदराबादमधील पोलिसांनी केलेल्या कारवाईला माझं समर्थन असल्याचं, चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

नराधमांनी दिल्लीची, कोपर्डीची निर्भया, नयना पुजारी अशा किती निष्पाप जिवांचा बळी घेतला. आजही त्यांच्या आई-वडीलांच्या डोळ्यातलं पाणी खळत नाही. तेव्हाही नराधमांना असंच ठोकलं असतं तर अशी पुनरावृत्ती टळली असती, असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

माझ्या मुलीच्या आत्म्याला शांती लाभो. मी तेलंगणा पोलिसांचे आभार मानतो अशी भावना पीडितेच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. अनेकांनी या एन्काउंटरप्रकरणी पोलिसांचं अभिनंदन केलं असून काहींनी या एन्काउंटरबद्दल संक्षय व्यक्त केला आहे.

दरम्यान, हैदराबाद पोलिसांनी केलेल्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर असते. मात्र पोलिस यंत्रणा जर कायदा हातात घेत असेल तर कायद्याचे रक्षणकर्ता म्हणून कोणाकडे पाहायचं?, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या