औरंगाबाद महाराष्ट्र

…ते दोन हिरो कुठेच जाताना दिसत नाहीत- चित्रा वाघ

जालना | राज्याला दोन-दोन गृह राज्यमंत्री असताना महिला अत्याचाराचे सत्र सुरूच आहे, असं असताना ते दोन हिरो कुठं जाताना दिसत नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केलीय.

दीपक केसरकर आणि डाॅ. रणजित पाटील हे दोन गृह राज्यमंत्री महाराष्ट्राला असताना राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांना न्यायासाठी दारोदार हिंडावं लागत असून प्रशासनाकडून कोणतीच मदत केली जात नाही, असं त्या म्हणाल्या.

दरम्यान, राज्यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त आहे, अशा ठिकाणीच महिलांवर अत्याचार करून खून केला जातो, असंही त्या म्हणाल्या.

महत्त्वाच्या बातम्या–

-क्षणात नोटाबंदी करता, मग राम मंदिर का नाही?- उद्धव ठाकरेंचा सवाल

-भाजप-शिवसेना युतीबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य!

-शिवसेनेला मोठा धक्का; नगराध्यक्षांसह 5 नगरसेवक भाजपमध्ये

-विजय मल्ल्यासारखे स्मार्ट बना; भाजप मंत्र्याचा अजब सल्ला!

-संभाजी भिडे हा जातीय दंगली घडवणारा व्हायरस- चित्रा वाघ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या