‘पूजाच्या आत्महत्येदिवशी संजय राठोड यांचे 45 फोन कॉल’; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा दावा
मुंबई | राज्यभर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणामध्ये रोज काहीना काही गोष्टी समोर येत आहेत. शिवसेना नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव या प्रकरणात जोडलं जात आहे. सोशल माध्यमांवर या प्रकरणाशी निगडीत काही फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष भाजपने हे प्रकरण लावून धरलं आहे. भाजप उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी थेट संजय राठोडांचं नाव घेत त्यांच्यावर आरोप केला आहे. अशातच पुन्हा एकदा चित्रा वाघ यांनी संजय राठोडांवर टीका केली आहे.
पूजा चव्हाण या तरूणीने ज्या दिवशी आत्महत्या केली त्यादिवशी पूजाला मंत्री संजय राठोड यांच्या फोनवरून कॉल आले होते. या प्रकरणातील महत्वाचा दुवा असलेल्या अरूण राठोडने पोलिसांच्या 101 क्रमांकावरून तशी कबुली दिली असल्याचा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.
पुणे पोलिसांनी पूजा चव्हाणचा जो फोन जप्त केला आहे त्यावर जे मिस्ड कॉल आले आहेत ते कोणाचे आहेत?, याची स्पष्टता पुणे पोलिसांनी जनतेला देतील का? असे सवालही चित्रा वाघ यांनी केले आहेत. तर ते मिस्ड कॉल कोणाचे आहेत हे पोलिसांनी सांगावं, असंही चित्र वाघ म्हणाल्या.
दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांकडून घ्यावा आणि तक्षम सक्षम आयपीएस अधिकाऱ्याला देण्यात यावा अशी मागणी चित्रा वाघ यांनी यांनी राज्याच्या पोलीस महासचालकांकडे केली आहे. त्यासोबतच वानवडी येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुजोरी सर्वांनी पाहिली. पुणे पोलीस आयुक्तांनीही एकाही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. माझे प्रश्न मात्र त्यांनी लिहून घेतले असल्याचं चित्रा वाघ म्हणाल्या.
थोडक्यात बातम्या-
पुण्यातील ‘या’ प्रसिद्ध मारुतीच्या अंगावर निघाला 7 पोती शेंदूर, समोर आली तेजस्वी मूर्ती!
रॉबर्ट वाड्रा करणार राजकारणात एन्ट्री; केली ही मोठी घोषणा!
‘अजब सरकारची गजब कहाणी’; मुनगंटीवारांची ठाकरे सरकारवर बोचरी टीका
“संजय राठोडांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही”
‘भालचंद्र नेमाडे देशी दारू पिऊन…’; पूजा चव्हाणची ‘ती’ शेवटची पोस्ट व्हायरल!
Comments are closed.