“आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल?”
मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचं आव्हान दिल्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं. तीन दिवसांच्या राजकीय नाट्यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला ताब्यात घेतलं.
जेलमध्ये असताना पोलिसांकडून अतिशय हीन दर्जाची वागणूक मिळाली. कोठडीत असताना पोलिसांनी पाणीही दिलं नाही आणि वॉशरूमचा वापरही करू दिला नाही, असा खळबळजनक आरोप नवनीत राणा यांनी केला. यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी थेट मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांच्यावर निशाणा साधला आहे.
नवनीत राणांची तक्रार सांताक्रूझ पोलीस स्टेशन मधल्या लॉकअप बद्दल आहे आणि मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर त्याच्या आधीचा खार पोलीस स्टेशनमधील राणा दांपत्याचा चहा पितानाचा व्हिडीओ लोड करतात. आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल आयुक्त साहेब?, असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक व्हिडीओ ट्विट करत नवनीत राणांचे आरोप फेटाळून लावले होते. यानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत संजय पांडेंवर सडकून टीका केली आहे.
खा.नवनीत राणा यांची तक्रार सांताक्रूझ पोलीस स्टेशन मधल्या लॉकअप बद्दल आहे आणि @CPMumbaiPolice सोशल मीडियावर त्याच्या आधीचा खार पोलीस स्टेशन मधील राणा दाम्पत्याचा चहा पितानाचा व्हिडिओ लोड करतात…
आपल्या खोटारड्या मालकांची पापं झाकण्यासाठी अजून किती खोटेपणा कराल आयुक्त साहेब..? pic.twitter.com/D16RUuQTRN
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) April 26, 2022
थोडक्यात बातम्या-
छगन भुजबळांना ईडीचा मोठा दिलासा, घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पुढील 2 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“यांच्या धमन्यांमध्ये रक्ताऐवजी टोमॅटो सॉस भरलाय म्हणूनच…”
“किरीट सोमय्या भाजपचा नाचा आणि देवेंद्र फडणवीस त्याचे सूत्रधार”
मुंबईतून कोरोनाची धक्कादायक आकडेवारी समोर, टास्क फोर्सने केली महत्त्वाची मागणी
Comments are closed.