महाराष्ट्र

लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही- चित्रा वाघ

Photo Credit- Facebook/ Chitra Wagh & Abu Azmi

मुंबई | पूजा आत्महत्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी एक वक्तव्य केलं. महिला वर्षभर ‘लिव्ह इन’मध्ये राहून नंतर सांगतात माझ्यावर बलात्कार झाला होता, असं अबू आझमी म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार समाचार घेतला आहे.

लिव्ह इन म्हणजे सोबत राहणं फक्त, तो शरीरसंबंधांचा परवाना नाही, असं म्हणत चित्रा वाघ यांनी अबू आझमींवर टीकास्त्र सोडलं आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.

अबू आझमींना हे माहित नसेल लग्नाची बायकोही नवऱ्याविरोधात बलात्काराची तक्रार करू शकते. स्वतःला बायकोचे मालक समजणाऱ्यांना अशा कायदेशीर तरतूदींमागची खोली कशी कळणार, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

देशात कायदाच चुकीचा आहे. कायद्यानुसार कुठलीही स्त्री लग्नाशिवाय कुठल्याही व्यक्तीसोबत राहू शकते. तर तुम्ही एका महिलेला पुरूषासोबत. लिव्ह इन रिलेशनमध्ये राहू देता. कुठलाही गुन्हा, वर्षभर एकत्र राहिले आणि नंतर सांगितलं माझा बलात्कार झाला, असं अबू आझमी म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या-

राज्य सरकारच्या सेवेतील सर्वच दर्जाच्या पदांची भरती एमपीएससीमार्फत होणार?

‘नो वन किल्ड जेसिका’ सारखी पूजा चव्हाण प्रकरणाची गत होईल- देवेंद्र फडणवीस

चिंताजनक! मुंबईतील ‘या’ भागांमध्ये पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना

‘ऐकलं नाहीत तर याद राखा’; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारला इशारा

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात संचारबंदी लागू; सर्व शाळा, महाविद्यालये बंद

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या