बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“व्वा रे बहाद्दर…महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय?”

नवी दिल्ली | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांवर गंभीर आरोप केले आहेत. यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. यानंतर लोकसभेतही याचे पडसाद उमटले. या मुद्द्यावरून  खासदार नवनीत राण यांनी लोकसभेत आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. आता नवनीत राणा यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर गंभीर आरोप केलाय. महाराष्ट्रातील प्रश्न संसदेत उपस्थित केल्यामुळे अरविंद सावंत यांनी आपल्याला संसदेच्या लॉबीत धमकावल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केलाय.

अरविंद सावंत यांच्या विरोधात खासदार नवनीत राणा यांनी तक्रार केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून याप्रकरणी कारवाईची मागणी नवनीत राण यांनी केली आहे. यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अरविंद सावंतांवर हल्लाबोल करत ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

व्वा रे बहाद्दर….. महाराष्ट्र नावावर करून घेतलात की काय ?, असा सवाल करत चित्रा वाघ यांनी अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांना या संदर्भात एक फेसबूक पोस्ट केली आहे. विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या धमक्या कसल्या देताय. आम्ही जिजाऊ सावित्रीच्या लेकी आहोत तुमच्या सारख्यांच्या धमक्यांना घाबरणाऱ्या नाही, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी अरविंद सावंतांना सुनावलं आहे.

दरम्यान, अरविंद सावंत यांनी नवनीत राणा यांचे आरोप फेटाळून लावले आहेत.नवनीत राणा यांनी केलेला आरोप साफ खोटा आहे. त्या मला येता जाता भैया-दादा म्हणून बोलतात. मी ही त्यांच्याशी बोलत असतो. एकतर त्या महिला आहेत आणि मी शिवसैनिक आहे. आम्ही महिलांना धमकावण्याचं काम करत नाहीत, असं अरविंद सावंत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

गृहमंत्री अनिल देशमुखांवर झालेल्या आरोपांवर डॅशिंग IPS कृष्ण प्रकाश म्हणाले…

ही कोणती ‘शर्यत’? सांगलीत बैलगाडा शर्यतीत बैलांना बॅटरीने शाॅक देत मोठ्या काठीने जबर मारहाण

…तर आधी स्वत: खासदारकीचा राजीनामा द्या आणि मग राष्ट्रपती राजवटीच्या गप्पा करा- रुपाली चाकणकर

‘मी पुन्हा येईनचं स्वप्न अजूनही जिवंत आहे’; रोहित पवारांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

नवनीत राणांचा अरविंद सावंतांवर लोकसभेत गंभीर आरोप, म्हणाल्या…

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More