बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते तर संजय राठोडला फाडून खाल्लं असतं”

नाशिक | भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून ठाकरे सरकार आणि संजय राठोडांवर निशाणा साधला आहे.

12 ऑडिओ क्लिपचं काय झालं? बलात्काऱ्याला सरकार का वाचवत आहे? एवढे पुरावे असतानाही एफआयआर का दाखल केला जात नाही? ही कसली शिवशाही ही तर मोगलाई आहे, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज मुख्यमंत्री नसते, तर त्यांनी राठोड यांना फाडून खाल्लं असतं, असंही चित्रा वाघ म्हणाल्यात.

संजय राठोड यांच्याविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. एका बलात्काऱ्याला वाचवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. सत्तेतील पक्षांची अशी एकी पहिल्यांदाच दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं धनंजय मुंडेंना वाचवलं. आता शिवसेना संजय राठोड यांना वाचवत आहे. हा चुकीचा पायंडा राज्यात पडत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्यात.

दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणावरून महाविकासआघाडी सरकारविरुद्ध रान उठवणाऱ्या चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विरोधात बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने किशोर वाघ यांच्यावर बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. याधीही किशोर वाघ यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. आता त्यांची या प्रकरणात पुन्हा चौकशी होणार असल्याचं कळतंय.

थोडक्यात बातम्या-

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

शरद पवार माझा बापच आहे, मला आज त्यांची आठवण येतीये- चित्रा वाघ

…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More