बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सोनू तू राऊतकडे लक्ष देऊ नको, आपल्याला रोगाशी लढायचं आहे रोग्याशी नाही- चित्रा वाघ

मुंबई |   अभिनेता सोनूने लॉकडाऊनच्या दरम्यान स्थलांतरित मजुर-कामगारांना त्यांच्या-त्यांच्या घरी पोहचवण्याचं काम केलं. परंतू त्याच्या या कामामागे कुठली तरी यंत्रणा काम करते आहे, असं म्हणत शिवसेनेने भाजपचं नाव न घेता सोनू सूदला थेट भाजपशी जोडलं. त्यानंतर आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. यावरूनच भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

डिअर सोनू सूद, राऊत कडे लक्ष देऊ नकोस, तू खूप चांगलं काम करत आहेस. लक्षात ठेव आपल्याला रोगाशी लढायचं आहे, रोग्याशी नाही, अशा शब्दात त्यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. तसंच या आशयाचा मेसेज वॉट्सअ‌ॅपवरून आल्याचं सांगायला देखील त्या विसरल्या नाहीत.

संजय राऊत यांनी सोनू सूदवर शरसंधान साधल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. भाजप नेत्यांनी शिवसेनेचा भूमिकेचा समाचार घेत भाजपचीच लोकं चांगलं काम करू शकतात असा शिवसेनेला विश्वास आहे, असा टोमणा मारत जर सोनू सूदला भाजपशी जोडत असाल तर आम्हाला आनंद आहे, असं म्हटलं.

दुसरीकडे सोनूने राजकीय वातावरण तापल्यावर रविवारी रात्री उशिरा मातोश्रीवर जाऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख हे देखील उपस्थित होते. या भेटीचा तपशील जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितलं, “सोनूने स्थलांतरित मजुरांना गावाकडे जाण्याविषयी जी काही मदत केली त्यावर आमच्यात दीर्घ चर्चा झाली”.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

वारकऱ्यांमध्ये अजित पवार यांचा दुजाभाव, प्रकाश आंबेडकर यांनी केली ‘ही’ प्रमुख मागणी

शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे- उद्धव ठाकरे

महत्वाच्या बातम्या-

….म्हणून मला शिवभक्तांचा सार्थ अभिमान, त्यांच्या समोर मी नतमस्तक- छत्रपती संभाजीराजे

काँग्रेसचं ठरलं… कोरोनासोबत जगायचं! कार्यालयीन कामकाज पुन्हा सुरु पण लोकांना प्रवेशासाठी ‘ही’ अट

कोरोनाविरुद्धच्या लढाईत आता गायीची मदत, अमेरिकन कंपनीनं केला ‘हा’ मोठा दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More