बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘चित्रा वाघच तुम्हाला पुरुन उरणार आहे’; चित्रा वाघ आक्रमक

नाशिक | पुरोगामी महाराष्ट्र सगळं बघतोय मुख्यमंत्री साहेब आम्ही आवाज उठवला तर आमच्यावरच केसेस? पण केसेस दाखल जरी झाल्या तरी आम्ही प्रश्न विचारतच राहू, ही चित्रा वाघ तुम्हाला पुरुन उरेन, अशा इशारा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारला दिला आहे.

चित्रा वाघ यांच्या नेतृत्वाखाली आज नाशिकमध्ये वन मंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणावरून ठाकरे सरकार आणि संजय राठोडांवर गंभीर आरोप केले आहेत.

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी आवाज उठवल्यामुळे माझ्या नवऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. माझ्या पतीविरोधात बेहिशोबी मालमत्ताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण माझ्या पतीला नाही तर मलाच या लोकांना अडकवायचं होतं, असा दावा चित्रा वाघ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री महोदय, या बलात्काऱ्याला हालकून द्या आणि दाखवून द्या महाराष्ट्राला… या राज्यात लेकी बाळांच्या अब्रुला हात घालाल तर तुमची गय करणार नाही, असंही चित्रा वाघ म्हणाल्यात.

12 ऑडिओ क्लिपचं काय झालं? बलात्काऱ्याला सरकार का वाचवत आहे? एवढे पुरावे असतानाही एफआयआर का दाखल केला जात नाही? ही कसली शिवशाही ही तर मोगलाई आहे, अशी टीकाही चित्रा वाघ यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार माझा बापच आहे, मला आज त्यांची आठवण येतीये- चित्रा वाघ

…म्हणून मुंबईत कोरोना बळावतोय- आनंद महिंद्रा

पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणखी एक आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…

“नगराळे यांचं वक्तव्य ज्यांना धक्कादायक वाटतं ते मुर्खांच्या नंदनवनात फिरतायेत”

धक्कादायक! भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More