महाराष्ट्र मुंबई

“उद्धव ठाकरेंचा खोटारडेपणा समोर आलाय, त्यांना जनता नक्की धडा शिकवेल”

मुंबई | वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे.

सरकारचाच फ्यूज उडाला आहे. अनेक लोकांना 50 हजारांपेक्षा जास्त वीजबिलं आली आहेत. उर्जामंत्री नितीन राऊत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा खोटारडेपणा समोर आला आहे. त्यांना जनता नक्की धडा शिकवेल, अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे.

नगरसेवक कुणाल पाटील यांच्यातर्फे कल्याण पूर्वेतील अडवली ढोकळी परिसरातील हळदी कुंकू कार्यक्रमात चित्रा वाघ आल्या होत्या. यावेळी बोलताना चित्रा वाघ यांनी विविध विषयांवर भाष्य केलं.

सर्वसामान्य नागरिकांना रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी जी वेळ दिली ती फार चुकीची आहे. अनेकांचे ऑफिसेस हे दहाला सुरू होतात. संध्याकाळी बंद होतात. त्यामुळे सरकारने लोकलच्या वेळेमुळे नोकरदार वर्गाला काहीही फायदा होणार नाही, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

वीजबिल भरा, अन्यथा महावितरण कंपनी अडचणीत येईल- अजित पवार

“अण्णा हजारे हे महाराष्ट्रातील हास्यास्पद व्यक्तिमत्त्व आहे”

“शरद पवारांसारखे अनुभवी नेते चुकीच्या पद्धतीने तथ्य मांडत आहेत”

RBIची मोठी कारवाई; महाराष्ट्रातील ‘या’ सहकारी बँकेचा परवाना रद्द

माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व पुण्य धनंजय यांना मिळो- तात्याराव लहाने

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या