बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊतांचं ‘हे’ वक्तव्य म्हणजे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे”

मुंबई | तपास यंत्रणांच्या कारवाईवरून राज्यात आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलेलं पाहायला मिळत आहे. त्यात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्यावरील सर्व खटले न्यायालयाने सीबीआयकडे सोपवले. यानंतर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार टीका केली.

सामना अग्रलेखातून केंद्रातील भाजप (BJP) सरकार व न्यायव्यवस्थेवर सडकून टीका करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या हाती असलेला न्यायाचा तराजू हा चोरबाजारातून विकत आणला असल्याची टीका संजय राऊत यांनी केली. राऊतांच्या या वक्तव्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी निशाणा साधला आहे.

केंद्र सरकारच्या हाती असलेला न्यायाचा तराजू हा चोरबाजारातून विकत आणल्याचं सर्वज्ञानी संजय राऊत यांचं वक्तव्य म्हणजे त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे लक्षण आहे, असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाने या वक्तव्याची गंभीर दखल घेऊन कडक कारवाई करावी, अशी मागणीही चित्रा वाघ यांनी केली.

दरम्यान, राज्यात भाजप आणि सेनेची (Shivsena) युती तुटल्यापासून दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यांनी टीका करायला सुरूवात केली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

“एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावं, कोणाचीही नोकरी जाणार नाही”

“कोरोनापेक्षा सध्या सुरू असलेलं राजकारण भयंकर”

महागाईचा फटका, पाच दिवसात चौथ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं, वाचा ताजे दर

पोस्टाची भन्नाट योजना, ‘इतक्या’ वर्षात तुमचे पैसे होतील डबल

मोठी बातमी! प्रवीण दरेकरांना न्यायालयाचा झटका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More