बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सत्तेत असल्यावर महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का?”

पुणे | पुण्याजवळील कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड मारहाण प्रकरण सध्या चर्चेत आहे. महिला सरपंचाला मारहाण करणारा युवक हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचा असल्याने या प्रकरणाला राजकीय रंग आला आहे. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून ठाकरे सरकार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

राज्यातील विविध भागातून या तरूणावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तरी सरकार या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर काहीच कार्यवाही करत नाही. सरपंच गौरी गायकवाड यांची विचारपूस करण्यासाठी चित्रा वाघ या आल्या होत्या. यावेळी वाघ यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे वक्तव्य केलं आहे.

राज्याचे गृहमंत्री हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे आहेत. त्यांनी आपल्या पक्षातील अशा वाईट लोकांवर तात्काळ कारवाई करायला हवी, असंही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. सत्तेत आल्यावर तुमची महिला सबलीकरणाची व्याख्या बदलते का?, असा सवालही त्यांनी सुप्रिया सुळे यांना केला आहे.

महिला सरपंचाच्या मान मर्यादा या भंगल्या आहेत. महिलांवर अन्याय करणाऱ्या आरोपीला जामीन सुद्धा मिळता कामा नये असा कायदा करावा लागेल. तसेच आजची राष्ट्रवादी ही साहेबांची राष्ट्रवादी राहिलेली नाही, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या 

तालिबानच्या मदतीला पाकिस्तान धावलं, पंजशीरवर पाकिस्तानचा हल्ला

कोरोनानंतर आता ‘या’ विषाणूची दहशत, मुलाच्या मृत्यूनं चिंतेत वाढ!

“लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?”

‘…त्यालाच तिकीट मिळणार’; राज ठाकरेंनी घेतली पदाधिकाऱ्यांची शाळा

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, ‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More